शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

लाईफ चेंजिंग कार्यशाळा सोमवारपासून

By admin | Updated: July 5, 2014 23:40 IST

लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्तवतीने ७ जुलै पासून डी.बी. सायंस महाविद्यालय लाईफ चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्तवतीने ७ जुलै पासून डी.बी. सायंस महाविद्यालय लाईफ चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
आज आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात कौशल्यपूर्ण ज्ञानाचा वापर गरजेचे झाले आहे. तांत्रीक कौशल्य न वापरता इतर अनेक कौशल्यांचीही जोड देण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचे वाढलेले ताण असून क्षुल्लक कारणांमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम यामुळे आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. म्हणून आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लावण्याकरिता स्वप्न आणि ध्येय समजून घेण्यासाठी या लाईक चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १४ जुलैपर्यंत घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातिप्राप्त वक्ते, लेखक व प्रशिक्षक नदीम काजी हे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, यश संपादनाच्या सवयी कशा अंगीकाराव्या, जीवनशैली कशी उंचवावी तसेच स्वप्न व ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रभावी टिप्स देतील. सोबतच आपल्या मनातील भीती दूर करण्याकरिता चक्क काचांवर चालण्याचे प्रशिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी दोन हजार रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे लोकमत युवा नेक्स्ट व बाल विकास मंचच्या सदस्यांना १ हजार ८०० रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर डी.बी. सायंस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष सूट दिली जाणार आहे.
सदर या कार्यशाळेकरिता नाव नोंदविण्याची अंतिम तारीख ६ जुलै आहे. अधिक माहितीसाठी ८८८८८७७३६४, ९८८१०११८२१ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(शहर प्रतिनिधी)