शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सोनी येथे मिशन इंद्रधनुष्यची सुरूवात

By admin | Updated: October 15, 2015 02:02 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे बुधवारी मिशन इंद्रधनुष्यचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.

गोरेगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे बुधवारी मिशन इंद्रधनुष्यचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे व उद्घाटक म्हणून जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.एस. कळमकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्यमध्ये ०-२ वर्षे वयोगटातील मुले व गरोदर माता जे लसीकरणापासून वंचित राहिले, त्यांना लसीकरण करण्याचे आवाहन डॉ. पी.जी. सडमेक यांनी केले. सदर कार्यक्रम चार टप्प्यांमध्ये घेऊन जिल्ह्यातील वंचित राहिलेले संपूर्ण बालक व गरोदर माता यांना लसीकरण करून १०० टक्के साध्य करायचे आहे. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सर्व सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी लसीकरणात ०-२ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.जी. सडमेक, आरोग्य सहायक भोंदे, आरोग्य सेविका शहारे, खंडाईत, भेलावे, भुरे, अंबुले, बागळकर, चाचेरे, औषधी निर्माण अधिकारी विनोद पटले, संजय लमर्थ, श्रीवास्तव, ठाकरे, पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)