शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरात पैसेवारी विरोधात शेतकऱ्यांचे धरणे

By admin | Updated: December 22, 2015 01:57 IST

तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५०

लाखांदूर : तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली असल्याने ती रद्द करुन ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहिर करुन लाखांदूर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीला घेऊन हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.चालू वर्षात पावसाची सरासरी निम्यावर आली. तर रोगामुळे धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुरता सापडला. पिक कर्ज, सावकराकडील कर्ज, उसनवार रक्कम घेतल्याने व उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी रडकुंडीवर आला. अशातच प्रशासनाने इंग्रजकालीन १०० वर्ष जुनी आणेवारी व उंबरठा पद्धतीन काढलेली आणेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त येत नसतांना तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून कापणी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन आणेवारी ५० टक्केपेक्षा जास्त नोंदवून शासनाला सादर केली असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला. खुद्द टेंभुर्णे यांनी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात १२ प्लॉट आणेवारी काढण्यासाठी दिले होते. त्यांची भेट घेवून तपासले असता तलाठ्यानी केलेले पंचनामे व टेंभुर्णेसह शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले पंचनामे यात मोठी तफावत दिसून आली. एकूणच तलाठ्यांचे पंचनामे बनावट असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाच्या आणेवारीला विरोध केला. यापुर्वी अशाच प्रकारे आणेवारी चूकीची काढल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे, यांनी आंदोलन केले होते. अखेर प्रशासनाने माघार घेत ३४ गावातील आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी केली होती. त्यामुळे तलाठयांच्या बेजवाबदारपणाच्या निषेधार्थ व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत व बॅकेतील सोनेतारण कर्ज माफ करावे, या मागण्यांना घेवून शेतकऱ्यांचा उपस्थीतीत धरणे आंदोलन समाजकल्याण सभापती चंद्रशेखर यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती वासूदेव तोंडरे, देवचंद कावळे, भोजराज राऊ त, मनोज ढेंगरी, प्रानेश्वर कावठे, दिगांबर साठवणे, काशीनाथ हत्तीमारे आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)