अठरा विश्वे दारिद्र्यातील किसनचे बिऱ्हाड पाठीवर

By Admin | Updated: December 23, 2015 02:29 IST2015-12-23T02:29:40+5:302015-12-23T02:29:40+5:30

अठराविश्वे दारिद्रयामध्ये जीवन जगणारा किसन राघो कावरे लोणारा येथील रहिवासी आहे.

Kisan Birkhad of poverty in the eighteen world poverty | अठरा विश्वे दारिद्र्यातील किसनचे बिऱ्हाड पाठीवर

अठरा विश्वे दारिद्र्यातील किसनचे बिऱ्हाड पाठीवर

घराच्या प्रतीक्षेत घर पडले : जागा नसल्यामुळे गाव सोडले, मुलांचा शाळेला रामराम
ंपालोरा(चौ.): अठराविश्वे दारिद्रयामध्ये जीवन जगणारा किसन राघो कावरे लोणारा येथील रहिवासी आहे. मागील अनेक वर्षापासून म्हातारी आई, पत्नी व दोन मुलासह पडक्या घरात राहत आहे. दारिद्ररेसेखाली नाव असतानी सुद्धा त्याला घरकुल मिळाले नाही. अखेर एकाएकी घर कोसळल्यामुळे त्यांचे कुटूंब रस्त्यावर आले. राहायला ठिकाण नसल्यामुळे किसन आपल्या कुटूंबासह गाव सोडले आहे. मात्र प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही.
पवनी पंचायत समिती अंतर्गत लोणारा हे गाव जवळपास २००० हजार लोकवस्तीचे आहे. मागील आठवड्यात किसन कोरे या गरीब मजुराचे घर जमिनदोस्त झाले. या संदर्भात लोकमतने पाठपुरावा केला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाना जाग आली नाही. किसन हा शेतमजूर आहे. दारिद्ररेषेखाली नाव समाविष्ठ असून सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने या लाभार्थ्याला प्रतिक्षा यादीमध्ये नाव समाविष्ठ केले नाही. परिणामता याला अनेक वर्षापासून घरकुल नाही.
ज्या लाभार्थ्याला घरकुल योजनेची गरज नाही अशा लाभार्थ्यांला घरकुल दिले जात आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नाही. किसनच्या घरी वीज नाही. इतके वर्ष तो आपल्या कुटूंबासह अंधारात वास्तव्याला होता. अखेर घर पडल्याने कुठे राहायला जागा मिळेल का म्हणून दारोदारी भटकत आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती पाहुन कुणी राहायला जागा द्यायला तयार नाहीत.
अशातच किसनने गाव सोडले. त्याचा मुलगा व मुलगी वर्ग २ मध्ये शिकत आहेत. राहायला जागा मिळत नसल्यामुळे किसने आपल्या पत्नीला मुलासह सासुरवाडीला पाठविले. मात्र दोन्ही मुले शिक्षणापासून दूर झाले आहेत.
अधिकारी म्हणतात बीपीएल मध्ये नाव असला तरी प्रतिक्षायादीमध्ये नाव पाहिजे. ग्रामसभेत ठराव घेतला जातो की याला घरकुल देण्यात म्हणून मात्र सभा संपताच गरजूना डावलून र्गीश्रीमंताचे नाव टाकले जाते, असा आरोप किसने केला आहे. हा लाभार्थी दारिद्ररेषेखाली मोडत असतानी सुद्धा त्याल आतापर्यंत शासनाकडून कोणतीही योजना मिळाली नाही. दिवसभर कष्ठ करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा कि घर बांधावे, असा प्रश्न या लाभार्थ्याला पडला आहे.
संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे. अगोदर त्यांचे नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ठ नव्हते. नंतर तहसील कार्यालयातून जी पुरवनी यादी आली आहे. त्यात त्यांचे नाव समाविष्ठ आहे. नव्याने प्रतिक्षा यादी तयार करीत आहोत. (वार्ताहर)

Web Title: Kisan Birkhad of poverty in the eighteen world poverty