लोखंडी हत्याराने मारून वृद्धाचे हात मोडले

By Admin | Updated: January 1, 2016 02:52 IST2016-01-01T02:52:24+5:302016-01-01T02:52:24+5:30

तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सातोना येथील तीन आरोपींनी संगनमत करून दसाराम नगदू टेंभेकर (७०) यांच्या

Kill the old man by killing an iron man | लोखंडी हत्याराने मारून वृद्धाचे हात मोडले

लोखंडी हत्याराने मारून वृद्धाचे हात मोडले

गोंदिया : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सातोना येथील तीन आरोपींनी संगनमत करून दसाराम नगदू टेंभेकर (७०) यांच्या हातापायावर व कमरेवर लोखंडी औजारांनी मारून जखमी केले. त्यामुळे दसाराम यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले.
ही घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. दसाराम टेंभेकर यांचा मुलगा अजय टेंभेकर व सून अश्विनी टेंभेकर यांच्यासह आरोपींनी विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद घातला होता. या वादात तिन्ही आरोपींनी संगनमताने टेंभेकर कुटुंबीयांशी वाद घालून शिवीगाळ केली व मारहाण केली. यात वृद्ध दसाराम टेंभेकर यांच्या हाताचे हाड मोडले.
दसाराम टेंभेकर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहे.
तपास नायक पोलीस शिपाई कांबडे करीत असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Kill the old man by killing an iron man