शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीमय वातावरणात कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:50 IST

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी भगवान शंकराची पूजा अर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात गर्दी केली होती.

श्रावणातील पहिला सोमवार : भाविकांनी केली मंदिरात पूजा-अर्चा लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी भगवान शंकराची पूजा अर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात गर्दी केली होती. जल व दुधाने अभिषेक करुन इच्छापूर्तीसाठी मंगलकामना केली. कावड यात्रा काढून बम बम भोले, ओम नम:शिवायचा गजर केला. त्यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाल्याचे चित्र होते.श्रावण महिन्यानिमित्त भगवान शंकराच अभिषेक करण्यासाठी भक्तांतर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक संस्कार गृप युवा संघटनेने यासाठी पुढाकार घेतला होता. आमगाव नगरीत बम बम भोले, ओम नम: शिवाय या भक्ती गजराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. संस्कार गृप या युवा संघटनेकडून वाघ नदी परिसरातून कावड यात्रेची सुरूवात झाली. कावड यात्रेत भक्तजन मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. कावड यात्रेनिमित्त जल सिंचन, शेत शिवारांना पाणी घालणे, राहणीमान परिसरात पशुपक्षी व पर्यावरणाला पाणी उपलब्ध करुन देणे असे संकल्प सोडत कावड यात्रेला भक्तांनी हजेरी लावली. कावड यात्रेने व्यक्तीमत्व विकास, संकल्प शक्ती आणि आत्मविश्वास वाढत असल्याचा समज देखील भाविकांनामध्ये आहे. गुणवत्ता व शक्तीची ओळख यातून पुढे येत शिव कृपेने प्रेरीत होण्याचे बळ निर्माण होत असल्याचे भाविक मानतात. कावड यात्रा नगरीत भ्रमण करीत शिव मंदिर महादेव पहाडी येथे शिव अभिषेक करण्यात आले. कावड यात्रा सालेकसा मार्ग, कामठा चौक, गांधी चौक, मानकर गुरुजी चौक ते आंबेडकर चौक ते रिसामा येथे भ्रमण करीत महादेव पहाडी येथील शिवमंदिर परिसरात दाखल झाली. यावेळी नदीपत्रातून तांब्याच्या पात्रात आणलेल्या पाण्याने शिव अभिषेक करण्यात आला. अभिषेक पूजन, महाआरतीनंतर शिव भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.