शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

By admin | Updated: March 22, 2016 02:17 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई

गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. रुग्णसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ नये, ही बाब दुर्दैवी ठरत आहे.गोंदिया एसटी बसच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल, दुकानवर अवलंबून राहावे लागते. ज्यांची हॉटेलमध्ये पाय ठेवायची ऐपत नाही त्यांना एखाद्या घरातून पिण्याचे पाणी मागून आपली तहान भागवावी लागते.जिल्ह्यातील साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनी जिल्हा सामान्य रूग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज रूग्णांची गर्दी असते. परंतु रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची येथे सोय नाही. गंगाबाई रुग्णालयात बाहेरील बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणून रूग्णाचे नातेवाईक स्वयंपाक करतात. तर काही जण बाहेरून जेवनाचा डबा बोलावतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते. रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी समोरील रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातही होऊ शकतो. केटीएसमधील पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फक्त एकच नळ रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. एक बोरवेल आहे. परंतु ती सुद्धा बंद पडली असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या शेकडो नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील बोरवेलवरून पाणी आणावे लागते. विशेष या या रुग्णालयाच्या बाहेर विविध भागातून गोळा केलेला कचरा उघड्यावर टाकला जातो. तिथे अतिशय घाण परिसर आहे. जुन्या बोअरवेलमध्ये औषधी टाकली जात नसतानाही येथील पाणी रूग्णांचे नातेवाईक वापरत आहेत. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया शहरातील बसस्थानक दरवर्षी कोट्यवधीचा नफा देणारे आहे. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना पाण्याच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागते. या बस स्थानकावरील प्रवाश्यांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणातून पाणी आणण्याचा प्रयत्न होत असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना, प्रवाशांना भटकावे लागण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)