शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड गुफेत स्वच्छता अभियान

By admin | Updated: February 6, 2016 01:49 IST

कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यानिमित्त आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी....

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : स्वच्छतेबद्दल गंभीरता दाखवत स्वत: घेतला सहभागसालेकसा : कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यानिमित्त आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी गुफा परिसरात स्वच्छता मोहिम राबवून एक नवीन उदाहरण सादर केले. पहिल्यांदाच घडलेल्या या प्रकाराची मात्र सर्वत्र चर्चा व कौतूक केले जात आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी कचारगडला भेट देण्यासाठी धनेगाव येथे पोहोचले. धनेगाव येथील यात्रेच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कचारगड देवस्थान व गुफेला भेट दिली व पाहणी केली. शेवटच्या टप्यात मोठ्या गुफेत त्यांनी प्रवेश केला व मोठ्या कुतुहलाने पाहणी केली.महाकाय गुफा पाडून तसेच आतमध्ये पाण्याचे स्त्रोत व वरुन प्रकाश टाकणारा बोगदा बघून आश्चर्यचकित झाले. त्याच ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली व विषयानुरुप आपले विचार मांडले. तसेच काही विषयांवर योग्य सल्ला दिला आणि परतीचा प्रवास सुरु करायला निघू लागले. त्यांच्याबोरब सर्व सहकारी घाई ने बाहेर निघायला लागले. परंतु एवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गुफेत इकडे-तिकडे पडलेल्या प्लास्टीक पिशव्या उचललायला सुरुवात केली व चला आपण या ठिकाणाला स्वच्छ करु असे आवाहन केले.काही कर्मचारी बघ्याच्या भुमिकेत राहिले परंतु काही त्यांची साथ देत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यात उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, तहसीलदार प्रशांत सांगळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आदिंनी घाणेरड्या पिशव्या, गुटख्याच्या पिशव्या व इतर घाण पसरवणारा कचरा उचलला. जिल्हाधिकारी मोठ्या गुफा परिसरात आत आणि बाहेरपासून खाली उतरेपर्यंत सतत परिसर स्वच्छ करीत राहिले. त्यानंतर वर एका ठिकाणी व खाली एका ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लावून त्याला आग लावाण्यात आली. कचारगड परिसरात ही अभिनव मोहिम राबविणारे ते पहिलेच अधिकारी ठरले. या दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता स्वच्छता मोहिम हा त्यांचा आवडता विषय असल्याचे त्यांनी सांगितले. यापुर्वी येथे अनेक अधिकारी, पदाधिकारी येऊन गेले. त्यात मंत्री, अमदार, जिल्हाधिकारी, सीईओ इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश राहीला. परंतु येथे स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल विचार कोणाच्याच डोक्यात आला नाही. किंवा घाण कचऱ्याला हाताने उचण्याची हिम्मत कोणी दाखविली नाही. या मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशनचा मोठा संदेश दिला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. (तालुका प्रतिनिधी)सहजता आणि स्वयंस्फूर्तीने केले प्रभावितजिल्हाधिकारी म्हटले की त्यांच्या पदाप्रमाणे त्यांचे सहकारी मदतीला तत्पर असतात. परंतु डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सहज आणि स्वयंस्फूर्तपणा बघून सर्व प्रभावित होऊन गेले. कचारगड गुफेत जाण्यासाठी पहाड चढत असताना त्यांनी खडतर चढावाचा मार्ग सहज चढला. त्यांचे काही सहकारी मधात थकून बसले. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मुळीच थकवा दिसून आला नाही. स्वच्छता राबवून स्वत: खाली वाहत असलेल्या झऱ्याच्या पाण्याने त्यांनी हात-तोंड धुवून घेतले. त्यानंतर हाजराफॉल परिसरात येऊन पाहणी केल्यानंतर धबधबा असलेला उंच पहाड स्फुर्तीने चढत एखाद्या पर्वतारोहीप्रमाणे कसब दाखविला.