शहरं
Join us  
Trending Stories
1
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
2
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
3
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
4
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
5
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
6
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
7
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
8
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
9
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
10
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
11
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
12
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
13
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
14
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
15
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
16
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
17
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
18
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
19
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
20
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल क्षेत्रातील नवयुवकांसाठी कबड्डी स्पर्धा व विविध उपक्रम

By admin | Updated: November 22, 2014 00:43 IST

पोलीस ठाणे चिचगडच्या वतीने नवयुवकांकरिता खुली कबड्डी स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरपर्यंत घेण्यात आली.

देवरी : पोलीस ठाणे चिचगडच्या वतीने नवयुवकांकरिता खुली कबड्डी स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरपर्यंत घेण्यात आली. यात नक्षलप्रभावी क्षेत्रातील नवयुवकांनी तसेच पोलीस ठाणे परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन उत्साह दर्शविला. सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार ५५५ रूपये, व्दितीय तीन हजार ३३३ रूपये, तृतीय दोन हजार २२२ रूपये आणि प्रोत्साहनार्थ इतर बक्षिसे ठेवण्यात आले होते. यात एकूण ४४ चमूंनी भाग घेतला. प्रथम पारितोषिक शिक्षक संघ चिचगडच्याा चमूने पटकाविले. व्दितीय क्रमांक जय दुर्गा क्रीडा मंडळ आलेवाडाच्या चमूने तर तृतीय क्रमांक जय शारदा क्रीडा मंडळ पिंडकेपारने पटकावले. सदर बक्षिसांचा वितरण सोहळा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आयआरबी गृपचे पोलीस निरीक्षक घुगे, देवरीचे माजी उपसभापती इंदल अरकरा, चिचगडचे उपसरपंच भैसारे, अण्णा जैन, विजय कश्यप, तंमुसचे अध्यक्ष खंडारे, डॉ. ठवरे, शेख अब्दुल्ला, व्दारकाप्रसाद धरमगडे, अल्ताफ हमीद, पोलीस पाटील गणेशराम मारगाये उपस्थित होते. मान्यवरांनी शासनाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम, योजनांचा लाभ कशारितीने मिळवून घ्यावा, वाहतूक नियम, दहशतवाद घटनांना हाताळताना कसा बचाव करता येईल, गुन्हेगारीपासून परावृत्त राहणे व देशाच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व योजनांचा लाभ मिळविण्याकरिता पोलिसांनी नि:संकोच मदत घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले. तसेच नवयुवकांनी पोलिसांच्या कामात सहकार्य करून देशविघातक कृत्य करणाऱ्या माओवादी संघटना, समाजकंटक यांना पळवून लावण्याची जबाबदारी सांभाळावी यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाकरिता पोलीस विभागाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार आर.पी. तिवारी यांनी व संचालन पोलीस शिपाई ओमप्रकाश जामनिक यांनी केले. कार्यक्रमासाठी चिचगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हस्के, पोलीस हवालदार रमेश येळे, ईस्कापे, गोमासे, मेश्राम, देशकर, कोसमे, दसरे, इंगळे, पारधी, सोनवाने, अतकर, पेटकुले, पटले व आयआरबीग्रुप औरंगाबादच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेदरम्यान स्वच्छ गाव अभियानाचे पॉम्प्लेटचे वितरित करण्यात आले. (प्रतिनिधी)