शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून बस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:19 IST

तिरोडा तालुक्यातील तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा या १८ किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली

विद्यार्थ्यांचे नुकसान : तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा रस्त्याची दुरवस्था लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा या १८ किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. तर मागील १५ दिवसांपासून एसटी महामंडळाची बससुद्धा या मार्गावरून बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या परिसरात चार ते पाच रेती घाट असून याच मार्गाने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असते. अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याच पावसाचे पाणी साचते व रस्त्यावर चिखल पसरतो. जिल्हा परिषदेमध्ये या रस्त्याची नोंद जिल्ह्यातील सर्वाधिक खराब रस्ता, अशी झाली आहे. रेती घाटांमुळे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकांची वाहतूक या रस्ताने होते. ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना सीडी वर्क व सायडींगला मातीकाम केल्यामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून तुमसर-घाटकुरोडा-तिरोडा बस बंद आहे. या रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे घाटकुरोडा, घोगरा, चांदोरी, मांडवी, बेलाटी येथील ग्रामस्थांना फटका बसला आहे. रस्त्याचे काम योगरित्या व सुरळीत करण्यात आले नाही तर जि.प. सदस्य मनोज डोंगरे व सरपंच स्वाती चौधरी यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा चर्चा करण्यात आली. तरीही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी करणार आंदोलन रेती घाटांवरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा रस्त्याची दुरवस्था दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे मजबूत व सुरळीत बांधकाम करण्यात आले नाही तर जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे व कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व सरपंच तसेच सदस्य यांच्यासह आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.