सात घरांवर चालविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:16+5:30

मोठ्या उड्डाणपुला पलीकडील म्हणजेच गोंदिया शहराच्या अर्ध्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याकडे आहे. मात्र असे असतानाही रामनगर पोलीस ठाणे अत्यंत तोकड्या जागेत चालविले जात आहे. अशात पोलीस ठाण्यांची स्वत:ची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत तयार करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

JCB operated on seven houses | सात घरांवर चालविला जेसीबी

सात घरांवर चालविला जेसीबी

Next
ठळक मुद्देठाण्याच्या इमारतीसाठी काढले अतिक्रमण : अन्य अतिक्रमणधारकांनाही इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रामगर पोलीस ठाण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण अखेर नगर परिषदेने बुधवारी (दि.६) काढले. यांतर्गत सात घरांवर नगर परिषदेचा जेसीबी चालला. तर अन्य काही अतिक्रमणधारकांनाही त्यांचे अतिक्रमण काढण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.
मोठ्या उड्डाणपुला पलीकडील म्हणजेच गोंदिया शहराच्या अर्ध्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याकडे आहे. मात्र असे असतानाही रामनगर पोलीस ठाणे अत्यंत तोकड्या जागेत चालविले जात आहे. अशात पोलीस ठाण्यांची स्वत:ची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत तयार करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली व नगर परिषदेची रामनगर शाळेतील समोरील जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यात आली. त्या जागेची मोजणी १६ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आली होती. आता पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू करावयाचे आहे. मात्र त्या जागेवर काहींनी अतिक्रमण करून घरे तयार केली आहेत.
सहा घरे आणि इतर मालमत्ता अतिक्रमणात येत असल्याने त्यांना वर्षभरापूर्वी नोटीस देण्यात आले. तरिही त्यांनी अतिक्रमण काढले नाही व अशात नगर परिषदेच्या पथकाने बुधवारी (दि.६) अतिक्रमण काढण्यासाठी धडक दिली. यात सात घरांवर नगर परिषदेचा जेसीबी चालला. तसेच अन्य अतिक्रमणधारकांनाही अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्याकडे इतरत्र जागा असल्यास त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधून देण्यात येतील असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.

Web Title: JCB operated on seven houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.