शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत गाजला प्रलंबित विकास कामांचा मुद्दा

By admin | Updated: June 15, 2014 23:37 IST

विधानसभेच्या चालू बजेट अधिवेशनात आ. गोपालदास अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून नियम १०५ अंतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेत प्रलंबीत विकास कार्यांचा मुद्दा उचलला. त्यांनी सादर केलेल्या

गोंदिया : विधानसभेच्या चालू बजेट अधिवेशनात आ. गोपालदास अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून नियम १०५ अंतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेत प्रलंबीत विकास कार्यांचा मुद्दा उचलला. त्यांनी सादर केलेल्या प्रश्नाच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीद्वारे ३५० लाख रूपये रस्ते, पूल दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत ४८१ लाख व पूर दुस्ती कार्यक्रमांतर्गत १५३८ लाखांचा निधी सन २०१३-१४ मध्ये उपलब्ध करविण्यात आला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे हाल झाले. राज्य शासनाकडून रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला २३.७० कोटी मिळवून दिले. परंतु जिल्हा परिषदेद्वारे आतापर्यंत कोणतेही काम सुरू करण्यात आले नाही. येणाऱ्या काही दिवसांत पावसामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम शक्य होणार नाही. याचा त्रास जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावा लागेल. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही शासनाकडून निधी उपलब्ध करून दिली. परंतु जिल्हा परिषद प्रशासन व बांधकाम विभाग कामांना मंजुरी देत नाही. या अधिकाऱ्यांच्या चुकांचे फळ जनता व लोकप्रतिनिधी भोगत आहेत. अशाप्रकारे दोन वर्षांपासून गोंदिया पंचायत समितीच्या दुसऱ्या माळ्याच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग योजनेस क्रियान्वित करीत नाही. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. अग्रवाल यांनी केली.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले की, नियमानुसार निधी गोंदिया जिल्हा परिषदेला देण्यात आली. तेव्हा जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कार्यांची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणे गरजेचे होते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेद्वारे वेळेवर प्रस्ताव पाठविण्यात आले नाही. त्यासाठी झालेला विलंब संशयास्पद आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाद्वारे पाठविण्यात आलेल्या निधीचा उपयोग न होणे, ही गंभीर बाब आहे. यावर आ. अग्रवाल म्हणाले की, नागरिकांना नियम व कार्यपद्धतीशी काही घेणेदेणे नाही. नागरिकांची मागणी चांगल्या रस्त्यांची असून ते त्यांचे हक्क आहे व शासनाची जबाबदारीसुद्धा. याबाबत ग्राम विकास मंत्री जयंत पाटील सहमत असल्याचे सांगून म्हणाले की, लोकप्रतिनिधी आपले कर्तव्य पार पाडूनही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे गोंदिया जिल्ह्याच्या रस्त्यांच्या दुरूस्तीत विलंब होत आहे. पाटील यांनी त्वरीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय समितीचे गठन करून जि.प. द्वारे झालेल्या विलंबाची चौकशी व सर्व प्रलंबित कार्यांना त्वरीत मंजुरी देवून विकास कार्ये प्रत्यक्ष सुरू करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाचे जिल्हाधिकारी यांनी जि.प. प्रशासन व जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जि.प. द्वारे सर्व प्रस्तावित दुरूस्ती कार्यांना मंजुरी दिली व कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)