शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत

By admin | Updated: January 1, 2015 23:04 IST

काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची

गोंदिया : काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. सध्याचे जग तंत्राज्ञानाने आणि त्यातही मोबाईलक्रांतीने भारले गेले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होत आहे. टॅबबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत मिळत आहे. विकसीत तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज व वेगाने उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटमुळे सध्या जग चांगलेच वेगवान झाले आहे. जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, त्वरित ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून बिल भरणे, स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरणे, सोशल मीडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे हातातल्या मोबाईल, टॅबच्या माध्यमातून होतात. साधारणपणे १० ते १२ वर्षांपूर्वीसायबर कॅफे या प्रकाराला सुरु वात झाली. इंटरनेटवरून कुठलीही माहिती घ्यावयाची असल्यास इंटरनेट कॅफेतच जावे लागत होते. ते ही शहरातच असल्याने ग्रामीण भागातील युवकांची तारांबळ उडायची. तसेच फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटची भुरळ पडल्याने इंटरनेट कॅफेतच युवकांचा ठिय्या असायचा. सोबतच इंटरनेट वरील गेमही खेळण्याची क्रेझ वाढली. त्यामुळे इंटरनेट कॅफेमालकांचा व्यवसाय तेजीत होता. परंतु गत दोनच वर्षात स्मार्टफोन अत्यल्प किंमतीत मिळायला लागल्याने आणि त्यामध्ये इंटरनेट सहज वापरता येत असल्याने युवकांच्या खिशात इंटरनेट सामावले गेले. यामुळे साहाजिकच कॅफेकडे जात असणारी पावले थांबून आता मोबाईलवर बोटे फिरू लागली. त्यातच व्हॉट्स अ‍ॅॅप, हाईक, वी चॅट यासारखी खास मोबाईल साठीची संवाद साधने आल्याने स्मार्ट फोनचा वापर जिल्ह्यात अतोनात वाढला असून इंटरनेट कॅफे कमी होत आहे. केवळ शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागात कॅफेचा उपयोग होत असून यामुळे कॅफे चा व्यवसायच वांद्यात आल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी )