शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात जखमीची वन विभागाकडून थट्टा

By admin | Updated: October 15, 2015 02:04 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून...

शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. नुकसान भरपाई म्हणून वन विभागाने १ हजार २७० रुपयाचा चेक देऊन त्यांची थट्टाच केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर असे की, ६ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सदर कास्तकार नित्याप्रमाणे धानाच्या बांध्यात पाणी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी गेला असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. चेहऱ्याला नखाने गोटून डोळ्या खालचा मांस काढून टाकला होता. शेतकऱ्याच्या कुत्र्याने जोरजोराने भूकुंन अस्वलाला पळून जाण्यास भाग पाडले. त्याच शेतशिवारातील इतर कास्तकार धावून गेले असता संतोष वरखडे जखमी अवस्थेत पडले होते. आरडाओरड झाल्याने इतरही लोक जमा झाले व जखमी संतोषला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमीवर प्रथमोपचार करून त्वरित केटीएस रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. त्यांची अवस्था बघून तेथून लगेच वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे दोन आठवडे उपचार चालला. परिस्थिती हलाखीची असल्याने गावातील लोकांनी मदत केली तर काही रक्कम कर्जाच्या स्वरुपात घेऊन औषधोपचार केला. हिंस्त्र पशूने हल्ला केल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. चेहरा विद्रुप झाल्याने डॉ.के.के. रामटेके यांच्याकडून सर्जरी करून घेतली, त्याचा खर्च १९ हजार ७०० रुपये आला होता. नुकसान भरपाई मिळाल्यावर इतरांकडून घेतलेली रक्कम परत करणार होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारतामारता जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला. त्यानंतर त्यांना वन विभाग कार्यालय गोंदिया यांच्याकडून फक्त १ हजार २७० रुपयांचा चेक देण्यात आला. चेकची रक्कम बघून पीडित कास्तकाराला धक्काच बसला. हिंस्त्र पशूपासून मृत्यू पावले त्यांना अथवा गंभीर जखमींना शासन लाखोचा निधी देतो. मग एवढ्या गंभीर जखमीला १ हजार २७० रूपयांचा चेक कोणत्या आधारे देण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित व्यक्तीला त्वरित नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे. (वार्ताहर)