शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या चटक्याने फळे झाली कडू

By admin | Updated: April 22, 2017 02:36 IST

उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो.

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : पौष्टिक आहार झाला दुरापास्त गोंदिया : उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो. पौष्टिक आहाराची खाण असलेली फळे आज मात्र महागाईच्या चटक्याने भाजल्या गेली आहेत. फळांचे दर ऐकताच घाम येणार आज अशी स्थिती असून महागाईच्या चटक्याने फळे कडू झाली आहेत. त्यामुळे शरीराला लागणारा पौष्टिक आहारच आता हिरावला गेला आहे. आज प्रत्येकच पदार्थांत रसायनांचा वापर व भेसळ होत असल्याने खाद्यान्यांतील पौष्टीकता व सकसपणा लोप पावला आहे. त्यामुळे जेवणालाही पूर्वी सारखा रूचकरपणा उरलेला नाही. अशात दररोजच्या जेवणासह शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्वांसाठी फलाहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फळांतून शरिराला आवश्यक ते जीवनसत्व मिळतात. मात्र आजची महागाई जेथे दोन वेळचे जेवण हिरावून घेत आहे तेथे फळांची तमा काय अशी स्थिती बघावयास मिळत आहे. कधी कांदा, कधी डाळ तर कधी टमाटर डोळे वटारते. अशात कोणकोणत्या वस्तूंचा त्याग करायचा हा प्रश्न पडतो. मात्र पोटाची आग शमविण्यासाठी खिशात हात घालावाच लागतो. पौष्टीक जीवनसत्वांची खाण असलेल्या फळांनाही या महागाईने आपल्या पाशातून सोडले नसल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की, आज बाजारात मिळणाऱ्या फळांचे दर एवढे चढले आहेत की, दर ऐकताच हातपाय गळतात. अशात एखाद्या स्वस्थ माणसाला तर सोडाच मात्र आजारी माणसालाही फळं खायला देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. म्हणूनच महागाईच्या चटक्याने फळं कडू झाले म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी) फळे होणार गायब एरवी बाजारात दिसणारी काही फळे उन्हाळ्यात मात्र दिसत नाहीत. उन्हाळ््यात हिरव्या भाज्या ज्याप्रमाणे बाजारात येत नाहीत, त्याचप्रकारे काही फळेही बाजारातून गायब होतात. यात संत्री, अंगूर व डाळींबांचा समावेश आहे. उन्हाळ््यात या फळांचे उत्पादन होत नसल्याने ही फळे आता बाजारात येणार नसल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत. फळांच्या राजाची धूम उन्हाळा म्हटला म्हणजे फळांच्या राजाचा हंगाम. त्यामुळे सध्या बाजारात आंब्याची चांगलीच धूम आहे. फळविक्रेत्यांकडे सध्या बैगनफल्ली, तोतापूरी व हापूस आंबा बघावयास मिळत आहे. यात बैगनफल्ली ६० रूपये किलो, तोतापूरी ४० किलो तर हापूस आंबा मात्र ६०० रूपये डझनच्या दराने विक्री केला जात आहे. वर्षातून एकदाच फळांचा राजा बाजारात येत असल्याने नागरिकांकडून त्याचा मनसोक्त आनंद लुटला जात आहे.