संविधानामुळे भारताचा विकास शक्य झाला

By Admin | Updated: February 8, 2016 01:54 IST2016-02-08T01:54:53+5:302016-02-08T01:54:53+5:30

गोरेगाव तालुक्यातील ग्रामकवलेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर शनिवारी

India's development was possible due to the constitution | संविधानामुळे भारताचा विकास शक्य झाला

संविधानामुळे भारताचा विकास शक्य झाला

प्रकाश धोटे : संविधान बांधिलकी महोत्सव
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्रामकवलेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर शनिवारी (दि.६) संविधान बांधिलकी महोत्सव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्यावतीने घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजीव मेळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश धोटे, केंद्रप्रमुख आर.एन. लदरे, ऋषीपाल टेंभरे, प्रकल्प अधिकारी वी.आर. कोकुडे, किशोर मलेवार, मुनेश रहांगडाले, करुना मेश्राम, ललिता लिल्हारे, हिरदीलाल रहांगडाले, राजीव मेळे उपस्थित होते.
सर्वप्रथम गावात संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्त रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. रॅलीचा समारोप शाळेत होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
डॉ. धोटे यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास व वैद्यानिक जीवनाचा अवलंब मानवाने केल्यास मानव भयमुक्त होऊन आपले जीवन सुखमय होत असते. मानवाला फसवता येते जनावराला फसवता येत नाही. बकरीचे भूत मांजरात येत नाही. प्राणी भूत आणण्याचे नाटक करीत नाही. माणूस अंगात भूत व देव आणून कसे नाटक करतो व कधी-कधी आपल्याला कसे फसवितो याचे अनेक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: India's development was possible due to the constitution