शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे

By admin | Updated: February 6, 2016 01:51 IST

लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे. ज्याप्रमाणे आपण वटवृक्ष लावतो, त्यापासून फूल, फळ व सावली मिळते. रोपटे लावल्यापासून त्यांची देखरेख व निगा राखतो.

कार्लेकर : बाल कल्याण जनजागृती कार्यक्रमगोठणगाव : लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे. ज्याप्रमाणे आपण वटवृक्ष लावतो, त्यापासून फूल, फळ व सावली मिळते. रोपटे लावल्यापासून त्यांची देखरेख व निगा राखतो. त्याप्रमाणे लहान मुलांची काळजी व निगा राखावी, असे दिवाणी न्यायाधीश कार्लेकर म्हणाले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथील सभागृहात बालकल्याण न्यायमंडळ व बालकल्याण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी तहसीलदार बाम्बोर्डे व उद्घाटक न्यायाधीश कार्लेकर होते. अतिथी म्हणून खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, ठाणेदार नामदेव बंडगर, अ‍ॅड. कापगते, पालीवाल, बनपुरकर, जिल्हा बालकल्याण अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायाधीश कार्लेकर पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतो. परंतु तो आत्महत्या का करतो? याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे संशोधन करणे गरजेचे आहे. तेव्हाच परिवर्तन घडून येऊ शकते. एवढेच नाही तर मुलांमध्ये दहशत निर्माण होऊ नये, असे कृत्य आपण करु नये, याची काळजी घेणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यास सांगितले जाते. प्रोजेक्ट वेडावाकडा जरी केला तरी त्या मुलाचे आपापल्या परिने भेटवस्तू देऊन स्वागत केले पाहिजे. त्यामुळे त्या मुलाला आपोआपच दुसऱ्यांदा अधिक चांगला प्रोजेक्ट तयार करण्याची प्रवृती निर्माण होईल.मंचावरील मान्यवरांनी बालगुन्हेगारीच्या संबंधात मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, पर्यवेक्षिका, बचत गटाच्या कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक महिला व बालकल्याण अधिकारी उषा आखरे, संचालन विस्तार अधिकारी भुरे व आभार पर्यवेक्षिका सुनीता दमाहे यांनी केले. (वार्ताहर)