रेती घाटांवरून रेतीची अवैध तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST2021-05-18T04:29:58+5:302021-05-18T04:29:58+5:30

प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे ...

Illegal smuggling of sand from sand ghats continues | रेती घाटांवरून रेतीची अवैध तस्करी सुरूच

रेती घाटांवरून रेतीची अवैध तस्करी सुरूच

प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरून दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करून त्याची तिरोडा तालुक्यात विक्री करीत आहेत. महालगावावरून गोंदिया व इतर परिसरात देवरी, किन्ही घाटावरून दासगाव, गोंदिया, तिरोडा तालुक्यातील सावरा, पिपरीया, अर्जुनी घाटावरून परिसरात करटी बु. ते एकोडीपर्यंत आणि कवलेवाडा, घाटकुरोडावरून तिरोडा शहरात व परिसरात ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करून विक्री केली जात आहे. तिरोडा तहसील कार्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कवलेवाडा घाटावरून रेती तलाठी कार्यालय समोरूनच नेत असतात;मात्र रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Illegal smuggling of sand from sand ghats continues