शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी साहित्याची अवैध विक्री

By admin | Updated: November 27, 2015 02:09 IST

शासनाच्या वतीने तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालय सुरू केले आहे. मात्र कृषी विभागाकडून ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना बी-बियाणे,

तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कृषी अवजारे, बी-बियाणे, औषधीची अधिक दरात विक्रीआमगाव : शासनाच्या वतीने तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालय सुरू केले आहे. मात्र कृषी विभागाकडून ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना बी-बियाणे, कृषी अवजारे, औषधी व अन्य साहित्य यांची योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले नाही. कृषोपयोगी साहित्याची अवैध विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी आपल्या घरी शासनाकडून शेतकऱ्यांकरिता आलेले सामान-साहित्य घेवून जातात. तसेच हे साहित्य जास्त किंमतीने विकण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याकडे तालुका कृषी अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यात काही मिलीभगत तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून शेतीपयोगी अनेक साहित्य, औषधी व बी-बियाणे कृषी विभागाला मिळतात. ते शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दराने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. मात्र तालुक्यात परिस्थिती उलटी आहे. कृषी विभागातील रिसामा येथील वास्तव्य करीत असलेला व आणखी नगरातील कर्मचारी आपल्या घरी शासनाकडून आलेले साहित्य, औषधी, बी-बियाणे ठेवतात. तसेच घरूनच इतरांना परस्पर विकतात. याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे साहित्य किंवा इतर सामान कर्मचाऱ्यांच्या घरी कशाप्रकारे जातात? हा मोठा चिंतेचा विषय आहे. आपल्या घरी विकण्याचा शासन नियम नाही. मात्र हा वेळापत्रक अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ज्यांना गरज आहे, त्यांना मिळत नाही व इतरांना बोलावून त्यांच्या दुकानात जाऊन साहित्य बि-बियाणे, औषधी व इतर सामानाची विक्री मनमर्जीने करण्यात आली आहे. यात अनाप-शनाप पैसे घेण्यात आले आहेत.शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषी विभागाकडून कसलेही सहकार्य मिळत नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे वास्तव्य भंडारा असल्याने ते मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे इतर कर्मचारी सुसाट सुटले आहेत. शेतकऱ्यांचा कुणी कार्यालयात वाली नाही. त्यांना कृषीविषयक मार्गदर्शन मिळणेही कठिण झाले आहे.त्यामुळे येथील सुरू असलेला खेळखंडोबा त्वरित बंद करावे व योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)