शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: June 15, 2014 23:36 IST

शहरात ठिकठिकाणी खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. या गंभीर प्रकारावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. मात्र एवढ्यावरही नगर पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काहीच प्रभाव पडला नाही.

गोंदिया : शहरात ठिकठिकाणी खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. या गंभीर प्रकारावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. मात्र एवढ्यावरही नगर पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काहीच प्रभाव पडला नाही. कारण दोन दिवस लोटूनही शहरातील खड्डे जसेच्या तसे दिसून आले. मागील दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस पडत आहे. अशात या खड्यांत पाणी भरून एखादा अपघात घडल्यास त्याला ती व्यक्तीच जबाबदार राहणार असा नियम नगर पालिकेने लागू केल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही.
शहरातील बाजार परिसर, चांदनी चौक, शारदा वाचनालय परिसर, सिंधी कॉलनी, कुडवा लाईनसह अन्य भागांत रस्त्यावरील खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने सोडण्यात आलेले हे आऊटलेट असून त्यावर झाकण न बसविल्याने हे खड्डे उघडेच आहेत. यातील कित्येक खड्डे मागील कित्येक वर्षांपासून उघडेच असून या खड्यांमुळे आजवर अपघातही घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगीतले. हीच समस्या आजही उद्भवत असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे.
नेमकी हीच बाब लोकमतने १३ जून रोजी शहरवासी व नगर पालिकेच्या नजरेत आणून दिली. विशेष म्हणजे या समस्येवर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाईचे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र दोन दिवस लोटूनसुद्धा शहरातील हे खड्डे आहेत तसेच आहेत. यावरून नगर पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी किती कर्तव्य तत्पर व शहरवासीयांप्रती किती सजग आहेत याची प्रचिती येते. मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांना भांबाऊन सोडले. तर पहिल्याच पावसाने नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल करून टाकली. अशात मात्र या खड्यांत पाणी भरून अपघात घडण्याची शक्यता टाळता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)