शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांवर जाहिराती, लायटिंग लावाल तर थेट गुन्हा दाखल होणार; अधिनियमांचे उल्लंघन पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:21 IST

Gondia : प्रदूषण आणि उष्णतेच्या बाबतीत संवेदनक्षम असलेल्या शहरात झाडेच ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. मात्र, याच झाडांच्या जीवावर आता जाहिरातदार आणि हौशी नागरिक उठले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
प्रदूषण आणि उष्णतेच्या बाबतीत संवेदनक्षम असलेल्या शहरात झाडेच ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. मात्र, याच झाडांच्या जीवावर आता जाहिरातदार आणि हौशी नागरिक उठले आहेत. झाडांना खिळे ठोकून जाहिरात फलक लावणे, रंगवणे आणि लखलखत्या विद्युतरोषणाईने त्यांना गुंडाळणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. झाडे ही केवळ नैसर्गिक संपत्तीसह शहराचा श्वास आहेत. 'महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५' नुसार झाडांना खिळे ठोकणे, फांद्या छाटणे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे.

खिळ्यांमुळे झाडांना जखमा, कीडही लागते

खिळे ठोकल्यामुळे झाडाच्या ऊतींना इजा होते. या जखमेतून बुरशी आणि कीड झाडाच्या आत शिरते. यामुळे झाड आतून पोखरले जाऊन कमकुवत होते आणि पावसाळ्यात अशीच झाडे अचानक उन्मळून पडतात, ज्यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो.

दोषींना शिक्षा आणि दंड

या कायद्यांतर्गत दोषींना १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. या 'छळवादा'मुळे वृक्षांना मरणकळा आली असून, आता अशा दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने तसेच वनविभागाने सुरू केली आहे.

झाडांना इजा पोहोचवणे दखलपात्र गुन्हा

झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ या कायद्यानुसार झाडाला इजा करणे, फांद्या तोडणे किंवा खिळे ठोकणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांचे विद्रुपीकरण केल्यास दंड आणि कारावासाची तरतूद आहे.

खिळे ठोकून जाहिराती, पाट्यांचा मारा

झाडांच्या खोडावर खिळे ठोकून त्यावर कोचिंग क्लासेस, डॉक्टर, इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकीय शुभेच्छांच्या पाट्या लावल्या जातात. जिल्ह्यातसुद्धा असले प्रकार घडत असून कित्येक ठिकाणी झाडे पाट्यांनी अक्षरशः झाकली गेली आहेत.

झाडांच्या मुळावर उठले लोक!

शहरातील मुख्य चौक असो वा अंतर्गत रस्ते, झाडांचा वापर जिवंत 'होर्डिंग'सारखा केला जात आहे. स्वतःच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी निसर्गाची हानी करताना नागरिक संवेदना हरवून बसले आहेत. झाडांना केवळ लाकूड समजून त्यावर होणारे आघात वृक्षांचे आयुष्य वेगाने कमी करत आहेत. गोंदिया-तिरोडा मार्गावरील अशा झाडांना मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावल्याचे दिसून येते.

विद्युतरोषणाईचाही झाडांना ताप

सध्या हॉटेलिंग आणि विवाह सोहळ्यांसाठी झाडांना 'एलईडी' माळांनी घट्ट गुंडाळले जाते. हे केवळ विद्रुपीकरण नसून झाडासाठी एक प्रकारचा 'शॉक' आहे. विद्युत तारांच्या घट्ट विळख्यामुळे झाडाला मोकळेपणाने श्वास घेता येत नाही.

उष्णता वाढते, पक्ष्यांचा अधिवास हिरावतो

सततच्या लायटिंगमुळे निर्माण होणारी उष्णता झाडांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम करते. झाडावर वास्तव्यास असणारे पक्षी आणि कीटक या कृत्रिम प्रकाशामुळे आपला अधिवास सोडून पळत आहेत. पक्ष्यांच्या प्रजनन चक्रावरही याचे घातक परिणाम होत आहेत.

"झाडांना विद्युतरोषणाईने विळखा घातल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वाढीवर विपरीत परिणाम होतो. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आम्ही अशा कृत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. जे व्यावसायिक किंवा नागरिक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झाडांचा 'बळी' देत आहेत, त्यांच्यावर भारतीय वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
- ए.एच. सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी-आमगाव.

English
हिंदी सारांश
Web Title : FIR Filed for Advertising, Lighting on Trees; Violations Costly

Web Summary : Gondia cracks down on tree damage. Advertising, lighting, and nailing harm trees, risking fines and legal action. Protect trees, protect the environment.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी