शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे?

By admin | Updated: June 14, 2014 23:40 IST

गोंदिया-भंडारा या आपल्या मतदार संघासाठी काय नाही केले? शेतीच्या सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. देशभरातील कंपन्यांचा सामाजिक दायित्व

प्रफुल्लभार्इंचा उद्विग्र सवाल : लोकांवर नाराज नाही, पण त्यांनी आत्मसिंचन करावे
गोंदिया : गोंदिया-भंडारा या आपल्या मतदार संघासाठी काय नाही केले? शेतीच्या सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. देशभरातील कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी या जिल्ह्यांसाठी आणून जिथे ज्या गोष्टीची गरज आहे, त्यासाठी तो दिला. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू होता, पण विकासाच्या या वाटेवर लोकांनी आपली साथ अर्ध्यातच सोडली. मला या निवडणुकीत हारण्याचे फार दु:ख नाही, मात्र एका लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे म्हणजे लोकांची अपेक्षापूर्ती होईल, हाच प्रश्न आपल्याला पडला आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्याच्या धक्क्यातून सावरल्यानंतर आणि राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर खा.पटेल यांनी शनिवारी पहिल्यांदाच गोंदियात पाऊल ठेवले. आपल्या रामनगर येथील बंगल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधताना पटेल यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.
आपल्या पराभवासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला दोष देणार नाही. आपल्या कार्यप्रमाणीतही काही दोष होता असे वाटत नाही. इतकी वर्षे राजकारण करीत असताना या जिल्ह्यातील लोक मला आणि माझ्या कार्यपद्धतीला ओळखत नाही असे होऊ शकत नाही. संपूर्ण देशभरात माझ्यासारखे आपल्या मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे केवळ ४-५ खासदार होते, हे मी ठामपणे सांगतो. मी कधीही जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. पण लोकांनी जर विकासाऐवजी अन्य गोष्टींना महत्व दिले असेल तर त्यात माझा काय दोष? असे पटेल यांनी स्पष्ट केले.
तुमच्या प्रयत्नाने जिल्ह्यात आलेले अनेक प्रकल्प आता पूर्ण होतील का? त्यासाठी तुम्ही मदत करणार का? या प्रश्नावर खा.पटेल म्हणाले, खरे तर आता याची पहिली जबाबदारी नवीन लोकप्रतिनिधीची आहे. आता त्यांचे सरकार आहे. तरीही त्यांना जिल्ह्यातील कोणत्याही विकासात्मक कामांसाठी माझी गरज वाटत असेल आणि ते काम माझ्यामुळे मार्गी लागेल असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी जरूर माझ्याकडे यावे, मी निश्चितच त्यासाठी मदत करील, अशी ग्वाही यावेळी पटेल यांनी दिली.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आपल्या वडिलांनी (मनोहरभाई पटेल) १९४६ पासून राजकारणाला सुरूवात केली. मीसुद्धा गेल्या २४ वर्षांपासून या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अनेकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. केवळ मंत्रीपद किंवा खासदारकी मिळाल्याने कामे होत नाही. त्यासाठी सर्व स्तरावर असलेले संबंध कामी येतात. आपण या ठिकाणी जे काही करू शकलो त्यासाठी या संबंधांचा योग्य उपयोग केल्यानेच ते शक्य झाले. राजकारणाला आपण व्यवसाय बनविले नाही. वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवरच आपण खुष असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ.राजेंद्र जैन व राकाँचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)