शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपकरणांमुळे आजारांची घरीच तपासणी

By admin | Updated: January 8, 2015 22:58 IST

नागरिकांत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय जनजागृती झाली आहे़ यामुळे सर्दी, ताप, खोकला या किरकोळ आजारांसाठी दवाखान्यात न जाता गुणकारी गोळ्या घेण्यावर भर दिला जात

गोंदिया : नागरिकांत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय जनजागृती झाली आहे़ यामुळे सर्दी, ताप, खोकला या किरकोळ आजारांसाठी दवाखान्यात न जाता गुणकारी गोळ्या घेण्यावर भर दिला जात असल्याचे दिसते़ तापमापीच्या साह्याने तापही सहज मोजला जात असल्याने खूपच ताप असल्यास डॉक्टरचा सल्ला घेतला जातो़ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हे लोण पसरले आहे़ यामुळे आरोग्याचे धोके मात्र वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे़सर्वच सुविधा आपल्या घरात असाव्या, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. आपले आयुष्य अधिकाधिक सुखकर व्हावे हाच त्यामागचा उद्देश असतो. यात कमी कष्टात अधिक काम करण्याची वृत्तीही अनेकांची असते. त्यातच सर्व जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने, फारसे कष्ट करण्याची गरजच राहिली नाही. हल्ली तर त्याची सवय सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनाही झाली आहे़ बहुतेकांना या चैनीच्या साधनांमुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे; पण यावरही उपाय म्हणून बहुतेकांनी किरकोळ आजाराचे सहज निदान करण्यासाठी विविध उपकरणे घरात आणून ठेवली आहेत. यामुळे घरा-घरात डॉक्टर्स निर्माण झाले असून किरकोळ आजारांचे निदान करणे सहज शक्य होत आहे; पण या पद्धतीत धोके अधिक असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घरगुती उपचाराला सामोरे जाण्याची गरज आहे.काही वर्षांपासून आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहेत; पण धावपळीत या समस्यांकडे लक्ष द्यायला व डॉक्टरांकडे जायला अनेकांना वेळ मिळत नाही. यामुळे वैद्यकीय उपकरणेच घरी येऊ लागल्याचे चित्र आहे. रक्तदाब तपासण्यासाठी बीपी जनरेटर, रक्तशर्करेच्या तपासणीसाठी ग्लुकोमीअर तसेच पल्स आॅक्सिमीटर यासारखी अनेक उपकरणे आज घरोघरी दिसू लागली आहेत. आपल्याला जाणवणाऱ्या त्रासाचे घरीच निदान करण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जात आहे. आजाराच्या चिंतेला थोडा विराम देण्यासाठी म्हणून या उपकरणांचा वापर करणे फायद्याचे ठरते; पण यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोक्याचे आहे. बीपी जनरेटर, ग्लुकोमीअर, पल्स आॅक्सिमीअर अशा अनेक उपकरणांची खरेदी वाढल्याचे दिसून येते. वारंवार डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्यापेक्षा एकदाच थोडे अधिक पैसे खर्च करून ही उपकरणे विकत घेऊ, या उद्देशाने अनेकजण याची खरेदी करीत असल्याचे दिसते़ सध्या आरोग्याबाबत घ्यायच्या चाचण्याही घरीच घेता येतील, असे शोध लागले आहेत. बहुतेकांचे वैद्यकीय ज्ञान वाढले आहे. डोळे झाकून डॉक्टर वा औषधी विक्रेत्याने दिलेले औषध घेतले जात नाही. त्यात या कंटेंट आहे, ड्रग आहे, हे तपासले जाते. मात्र हा प्रकार तेवढाच हानीकारक आहे. (शहर प्रतिनिधी)