कोरोना वॉरीअर्सचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:48+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार येथील दरेकसा रोडवरील चेक पोस्टवर थर्मल स्क्रिनिंग टेस्ट घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी प्रवाशांच्या शरीराचे तापमान, पल्स रेट व इतर तपासणी करीत त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेण्याचे काम करीत आहे.

Health of Corona Warriors threatened | कोरोना वॉरीअर्सचे आरोग्य धोक्यात

कोरोना वॉरीअर्सचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देउष्णतेच्या लाटेत गैरसोयीत कर्तव्यावर : कुलर व पंख्याअभावी आरोग्य कर्मचारी त्रस्त

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आज प्रत्येक पावलावर कोरोना संसर्गाचे संकट वाढत चालले आहे. त्यात सूर्याने आग ओकणे सुरु केले असून या नवतपात लोकांना दुहेरी मार सहन करण्याची वेळ आली आहे. अशात लोकांची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी प्रचंड उष्णतेत आपल्या जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतानाचे चित्र येथील चेक पोस्टवर बघायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून फ्रंट फुटवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार येथील दरेकसा रोडवरील चेक पोस्टवर थर्मल स्क्रिनिंग टेस्ट घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी प्रवाशांच्या शरीराचे तापमान, पल्स रेट व इतर तपासणी करीत त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेण्याचे काम करीत आहे. या चेक पोस्टवरुन छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातून येणारे प्रवासी ये-जा करीत आहेत. त्यांना चेक पोस्टवर थांबवून तपासणी करण्याचे काम २४ तास अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे येथे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाºयांना २४ तास सेवा प्रदान करावी लागत आहे. यात महिला व पुरुष डॉक्टर दोघांना कर्तव्यावर ठेवले जाते. परंतु २४ तास सेवा देताना या आरोग्य पथकाला ज्या प्राथमिक सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या अजिबात मिळत नसल्याने आपले कर्तव्य बजावताना हे कोरोना वारीयर्स स्वत: हतबल होऊन गेलेले दिसतात. ‘लोकमत’ प्रतिनिधीने चेक पोस्टला भेट दिली असता बाजूला आरोग्य पथकासाठी चहाटपरीच्या शेड खाली १ टेबल आणि २ खुर्च्यांची व्यवस्था होती. त्यातही चारही बाजूने खुले असलेले टिनाचे शेड व त्यावर रखरखते उन्ह पडत असल्याने तापलेले पत्रे व त्याखाली बसलेले किंवा उभे असलेले आरोग्य कर्मचारी प्रवाशांची तपासणी करीत असताना दिसले. अंगातून घामाच्या धारा निघत असताना सुद्धा ते आपल्या कर्तव्य चोखोपणे योद्धासारखे खंबीरपणे पार पाडीत आहेत. अशात त्यांच्यासाठी पिण्याच्या ठंड पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून होणे आवश्यक असताना ती सोय मुळीच दिसून आली नाही. जास्त तहान लागली की चेक पोस्टवरील पोलिसांकडून पाणी मागून त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गरमी पासून होणारा त्रास कमी करण्यासाठी कुलर किंवा पंख्याची सोय आवश्यक असून अशी कोणतीच सोय त्यांच्यासाठी करण्यात आली नव्हती.
अशात दुसºयांच्या आरोग्याची काळजी घेणाºयांना स्वत:च्या आरोग्याशी खेळण्याची वेळ येत आहे. ही बाब आरोग्य विभागाला लक्षात येत आहे की नाही याचे आश्चर्य वाटले.

जेवणासाठी वेळच मिळत नाही
या चेक पोस्टवरुन २४ तास लोकांचे येणे-जाणे सुरु असते. राज्य महामार्ग ३ राज्यांना जोडणारा असल्यामुळे इतर प्रांतातील प्रवासी सध्या सतत येण्या जाण्याचे प्रयत्न करी आहेत. त्यामुळे आरोग्य पथक नेहमीच व्यस्त राहत असून त्यांना नास्ता व जेवणासाठीही वेळ मिळत नाही. अशात तासनतास उपाशी राहूनही ते कर्तव्य बजावताना दिसून आले. दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचत असून उष्ण वाºयाची लाट शरीराला खूपच त्रासदायक व आरोग्याला धोकादायक असून बसण्याच्या ठिकाणी ग्रीन शेडची व कुलरची सोय असली पाहिजे. कोरोनाशी चालणारा संघर्ष किती काळ सुरु राहील हे सांगणे कठीण आहे. अशात कोरोना वॉरीयर्सच्या आरोग्याची काळजी सुद्धा आरोग्य विभागाने किंवा शासनाने घेणे आवश्यक आहे. नाही तर कोरोनाशी लढणे अवघड होऊ शकते. आरोग्य कर्मचाºयांनी आपली व्यथा सांगितल्या नाही तरी त्या विभागाने समजून घेण्याची गरज आहे.

Web Title: Health of Corona Warriors threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.