शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चाटनासाठी शासन उदासीन

By admin | Updated: June 18, 2014 00:17 IST

दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही

सौंदड : दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही. शिवाय तशा प्रकारचे कडक नियम करुन या नियमांचे काटेकोर पालनही होताना दिसत नाही.
अनेक बांधकामावर, हॉटेल, पान टपऱ्या, वीटभट्या, तेंदुपत्ता तोडाई अशा एक ना अनेक कामावर बालमजुरांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. याचे प्रमाणही कमी होताना दिसत नाही. या बालकामगारांकडून अधिक काम करुन घेऊन मजुरी मात्र अल्प दिली जाते. ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती दयनिय असते त्या-त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव मजुरी करतात. पोटाची आग विझविण्यासाठी नकळत अशा मुलांना मजुरीकडे वळावे लागते.बालकामगार कायदा हा बालमजुरांना पोषक असावा. बालकामगारांना कामावरुन काढून टाकल्यानंतर त्यांच्या घराला आर्थिक आधार मिळेल अशी योजना शासनाने तयार करण्याची गरज आहे. सडक/अर्जुनी तालुका किंवा गोंदिया जिल्हा किंवा संपूर्ण जगभरात बालमजुरी कमी होताना दिसत नाही. आजही हजारो बालकामगार विविध क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्यासाठी प्रस्तावित शाळांचाही दुरपर्यंत थांगपत्ता नाही. सडक/अर्जुनी तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरु असलेल्या डोंगरगाव ते कोयलारी रस्त्यावरील पुलाच्या कामावर दल्ली येथील चार अल्पवयीन शाळकरी मुले काम करीत आहेत. यात हितेश कुंभरे, (वर्ग १० वी), अरविंद मडावी (वर्ग ११ वी), विवेक मडावी (वर्ग १० वी) व शुभम उईके (वर्ग १२ वी) यांचा समावेश आहे. हे १५ ते १६ वर्षे वयोगटातील मुले पुलाच्या कामावर काम करतात. यामध्ये हितेश कुंभरे, विवेक मडावी हे दोघे उशीखेडा येथील शाळेत शिक्षण घेतात. तर अरविंद मडावी व शुभम उईके हे दोघे डोंगरगाव सडक येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत. ही चारही मुले मागील १५ दिवसांपासून पुलाच्या कामावर कार्यरत आहेत. या कामावर ही मुले ट्रॅक्टरने सिमेंट आणणे व सिमेंट काँक्रीटचे काम करतात.