शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

नकाशाच्या बाहेर कधी पडेल गोंदियातील कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:26 IST

जिल्हा निर्मितीला १८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा निर्मितीला १८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय व मनुष्यबळालाही त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने गोंदियाला वर्ग दोनचे कारागृह मंजूर केले. मात्र दोन वर्षापासून नकाशे तयार झाले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकच तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा अधिक गुन्हे घडतात. वर्षाकाठी १२५ ते १५० च्या जवळपास आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ लागतो. त्यातच वाहन व्यवस्था केली जाते. त्यात लागणारे इंधन ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन गोंदिया कारागृह तयार करणे गरजेचे आहे. गोंदियातील आरोपीना भंडारा येथे नेत असताना कुणी आरोपी पसार झाला. किंवा त्याने वाहनातून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर या प्रकारामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कारवाईस सामोरे जावे लागते. आरोपीं पळून गेल्यामुळे काही पोलीस शिपायांवर निलंबिनाची कारवाई झाली. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी गोंदियात कारागृह तयार करणे गरजेचे होते. शासनाने सन २०११-१२ मध्ये गोंदियात वर्ग एक चे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाकडून झाल्या. परंतु अधिक्षक बदलून गेले व वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव तसाच अद्यापही प्रलबिंत आहे. भंडारा जिल्हा कारागृह अधिक्षक म्हणून अनुपकुमार कुंभरे नोव्हेंबर २०१५ मध्ये रूजू झाले. त्यानंतर मंत्रालयातील नगररचना कार्यालयाने गोंदियात वर्ग दोन चे कारागृह तयार करण्याची मंजूरी देत त्यासाठी जागा पाहण्याचा आदेश काढला. त्यानुसार कारागृह भंडाराच्या अधिक्षकांनी जागेची पाहणी केली. गोंदियाच्या पोलिस मुख्यालयामागील जागेवर कारागृह तयार करण्याचे ठरले. वर्ग एकच्या कारागृह बांधकामासाठी ५५ कोटी रूपये लागणार असल्याचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. परंतु गोंदिया लहान असल्याने वर्ग दोनचे कारागृह तयार करण्याचे नंतर ठरले. वर्ग २ च्या कारागृहाला ३५ कोटी रूपये अंदाजे लागणार आहेत. त्या संबधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाकडे मागच्या वर्षी पाठविण्यात आला. परंतु, अद्यापही नकाशे तयार न झाल्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही. कारागृहासाठी २० एकर जागा पोलीस मुख्यालयाच्या मागील भागात ८.७५ हेक्टरमध्ये म्हणजेच २० एकर जमिनीत कारागृह तयार होणार आहे. यातील ४ हेक्टर जमीन शासनाची असून उर्वरीत जमीन शेतकऱ्यांची आहे. शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. ३०० आरोपींची क्षमता गोंदियातील आरोपींना या कारागृह ठेवण्यात येणार आहे. या तरूंगात २५० ते ३०० कैदी ठेवण्याची क्षमता असणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना भंडाराच्या कारागृह नेण्याचा पोलिसांचा त्रास कायम आहे. जागेची पाहणी करण्यात आली असून २० एकरात हे कारागृह तयार करण्यात येणार आहे. बांधकामाचे अंदाजपत्रक, नकाशे बांधकाम विभागाकडे आहे. खर्चाचा आढावा शासनाकडे लवकरच पाठविला जाणार आहे. नकाशे तयार न झाल्याने अंदाजपत्रक तयार झाले नाही. काम अंतीम टप्यात आले.- अनुपकुमार कुंभरे अधीक्षक कारागृह भंडारा.