शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

यू-डायसमध्ये गोंदिया पुन्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाही पहिला ठरला आहे.

ठळक मुद्देवेळेच्या आत १०० टक्के काम : संगणक प्रोग्रामरच्या कार्याला यश, तंत्रस्नेही शिक्षकांची मदत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाही पहिला ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने १६६३ शाळांची संपूर्ण माहिती यशस्वीरित्या भरून सलग तिसऱ्यावर्षीही प्रथम येणाच्या मान पटकाविला आहे.संपूर्ण राज्यात संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने भारत यू-डायस प्लस या ऑनलाईन पद्धतीद्वारे भरण्यात येत आहे. यात गोंदिया जिल्हा दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील एकुण १ हजार ६६३ शाळांची माहिती यू-डायस प्रणालीद्वारे भरण्यात आलेली आहे.याचा तालुकानिहाय विचार केल्यास, आमगाव १५५ शाळा, अर्जुनी-मोरगाव २०८, देवरी २०७, गोंदिया ४१५, गोरेगाव १५८, सडक-अर्जुनी १६७, सालेकसा १५२, तिरोडा २०२ अश्या १६६३ शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे भरण्यात आली आहे.विविध अभियानात अव्वल स्थान कायमगोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असला तरी शिक्षणाच्या प्रगतील प्रगत महाराष्ट्र घडविण्यात गोंदिया जिल्हा कुठेही मागे नाही. ज्ञान रचनावाद असो, प्रगतशिल शाळा असो, असर सर्वेक्षण असो, वाचन कट्टा असो किंवा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच्या माध्यमातून राबविण्यात कोणतेही उपक्रम असोत हे राबविण्यात गोंदिया जिल्हा मागे राहात नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल व तज्ज्ञ शिक्षकांच्या मेहनतीमुळे गोंदिया जिल्हा बहुतांश बाबींमध्ये राज्यात अव्वल स्थानावर आहे.शंभर टक्के काम करणारा जिल्हाआदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शाळांची माहिती भरण्यात जिल्हा राज्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्याच क्रमांकावर राहीला. जिल्ह्याने शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. यू-डायस प्लस फॉर्मद्वारे ३० डिसेंबर २०१९ ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या कालावधीत गोंदिया जिल्ह्याने आपले काम पूर्ण केले आहे. या मुदतीपर्यंत अजूनही अनेक जिल्ह्यातील कामे पूर्ण झाली नाहीत.