शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात गोंदिया जिल्हा ‘अ’ श्रेणीतच

By admin | Updated: March 22, 2017 01:23 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गोंदिया जिल्ह्याने सन २०१६-१७ मध्येही आपले ‘अ’ श्रेणीतील स्थान कायम ठेवले.

१४३ कोटी खर्च : ६७.४१ लाख मनुष्यदिवस काम नरेश रहिले   गोंदिया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गोंदिया जिल्ह्याने सन २०१६-१७ मध्येही आपले ‘अ’ श्रेणीतील स्थान कायम ठेवले. १६ मार्चपर्यंत ६७ लाख ४१ हजार ६८२ मनुष्य दिवस काम उपलब्ध करवून देण्यात आले. ३१ मार्चपर्यंत ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्य दिवस काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. आतापर्यंत या कामावर १४३ कोटी २२ लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. सन २०१६-१७ च्या वार्षिक मजूर अर्थसंकल्पानुसार ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्यदिवस काम उपलब्ध करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कामावर २५१ कोटी ८७ हजार रुपये खर्च करण्याचे ठरविले होते. एमआयएस अहवालानुसार १६ मार्चपर्यंत जिल्ह्यात ८५.६५ टक्के मनुष्य दिवस काम करण्यात आले. त्यावर ५६.८७ टक्के रक्कम खर्च करण्यात आली. आमगाव तालुक्याच्या मजूर अर्थसंकल्प ९ लाख ९४ हजार २६२ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यातील ६७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १२ हजार ६३९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ४० लाख ४४ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातील १००.८२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. देवरी तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १३ हजार ५० मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ४१ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. हे उद्दीष्ट ११७.२७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. गोंदिया तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ९० हजार ३२५ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ६९ लाख ४ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातील ९७.२३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. सालेकसा तालुक्याच्या मजूर अर्थसंकल्प ८ लाख ९२ हजार ९३२ मनुष्य दिवसाचा होता. त्यावर २८ कोटी ५७ लाख ३८ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यातील ९५.६० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तिरोडा तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १ हजार १३९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ३ लाख ६४ हजार रुपये खर्च करायचे होते. त्यातील ९६.११ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. सडक-अर्जुनी ‘सी’ ग्रेडमध्ये सडक-अर्जुनी तालुक्यात ९ लाख ८३ हजार ८७९ मनुष्य दिवस कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु ४ लाख ८९ हजार ७२२ दिवस काम झाले आहे. त्यावर ३१ कोटी ४८ लाख ४१ हजार रूपयांमधून ११ कोटी ६ लाख ३९ हजार खर्च करण्यात आले. हा तालुका मग्रारोहयोच्या कामात माघारला आहे. आमगाव व गोरेगाव तालुका ‘बी’ ग्रेडमध्ये आहे. गोरेगाव आणि सडक-अर्जुनी माघारले गोरेगाव तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ८२ हजार ७१० मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ४४ लाख ६७ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यापैकी ६०.८६ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ८३ हजार ८७९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ४८ लाख ४१ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन असताना त्यातील ४९.७७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.