शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अगरबत्ती व्यवसायातून दरवळतोय अनेक कुटुंबात सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी व्यवसाय सुरु करताना अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून ३ महिलांचा एक गट तयार केला. यानंतर त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व १०० किलो अगरबत्ती काड्या पुरविण्यात आल्या.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचे सहकार्य : ६० कुुटुंबांना मिळतोय रोजगार,देशभर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारुन त्यातून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरूवात केली. अशा अनेक यशोगाथा जिल्ह्यात आहेत.तिरोडा तालुक्यातील महिलांनी अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून व महिला आर्थिक विकास मंडळाच्या सहकार्याने तालुक्यातील ग्राम रामाटोला, टिकारामटोला, मेंदीपूर, गुमाधावडा, गराडा, तिरोडा या गावातील प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या ६० महिलांनी मागील तीन वर्षापासून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. यातून मिळणाऱ्या रोजगारामुळे त्यांच्या कुटुंबांत आनंदाचा सुगंध दरवळत आहे.प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी व्यवसाय सुरु करताना अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून ३ महिलांचा एक गट तयार केला. यानंतर त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व १०० किलो अगरबत्ती काड्या पुरविण्यात आल्या. तयार केलेल्या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था सुद्धा करुन देण्यात आली. एका मशिनद्वारे एका दिवशी ५० ते ६० किलो अगरबत्ती तयार केली जाते. प्रती किलो मागे दहा रुपये याप्रमाणे त्यांना मोबदला मिळतो. सरासरी एक महिला दिवसाला १५० ते २०० रुपये कमवित आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्याने त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा योगदान देत आहेत. पर्यायाने कुटुंबाची धुरा सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक कला कौशल्य असून त्यांना चालना दिल्यास त्या चांगली आर्थिक प्रगती साधू शकतात. नेमका हाच धागा पकडून अदानी फाऊंडेशनने त्यांना सहकार्य केल्याने त्यांना प्रोत्साहान मिळत आहे.ऑनलाईन विक्री सुरू करणारमहिलांना सदर व्यवसायातून जास्तीत-जास्त उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीने अदानी फाऊंडेशन प्रयत्नरत आहे. येत्या महिन्याभरात सुगंधीत अगरबत्ती अ‍ॅमेझान व फ्लीप कार्डद्वारे ऑनलाईन विक्री प्रगतीशील शेतकरी महिला कंपनीद्वारा अधिराक्षी या नावाने विक्री केली जाणार असल्याचे अदानी फाऊंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :businessव्यवसाय