शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक वापरावर बंदीचा फतवा

By admin | Updated: May 4, 2015 01:47 IST

केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियमांतर्गत पालिकेने शहरात प्लास्टिक वापरावर १ मे पासून बंदी घातली आहे.

गोंदिया : केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियमांतर्गत पालिकेने शहरात प्लास्टिक वापरावर १ मे पासून बंदी घातली आहे. यात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या व खर्रा पन्नी सारख्या वस्तूंचा समावेश आहे. यासाठी पालिकेने प्लास्टीक वापरावरील बंदीचा तसा फतवाच काढला असून अन्यथा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक व व्यवसायीकांना दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा वापर वाढतच चालला आहे. प्लास्टिकचा हा वापर मानवासह जनावरांसाठीही धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे वातावरणावर याचा परिणाम जाणवत असतानाच त्याचे अन्य दुष्परिणाही पुढे येत आहे. खाद्य पदार्थांसह प्लास्टिक खाल्याने जनावरांना आपल्या जीवास मुकावे लागत असल्याचे प्रकारही पुढे येत आहेत. प्लास्टिक सडत व गळत नसल्याने वर्षानुवर्षे तसेच पडून राहते. विशेष म्हणजे यात प्लास्टिक पिशव्या व खर्रा पन्नी वापर झाल्यानंतर उघड्यावर फेकून दिले जाते. पुढे त्या नालीत पडतात व तशाच साचत जाऊन नाल्या चोक करतात. एकंदर प्लास्टिकचा वापरच डोकेदुखी व तेवढाच धोकादायक ठरत आहे. यावर आळा बसावा या दृष्टीने पालिकेने केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०११ अंतर्गत शहरात प्लास्टिक वापरावर बंदी लावली आहे. यात पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक कोणत्याही स्वरूपात तसेच, खर्रा पन्नी नगर परिषद क्षेत्रात वापरण्यावर १ मे पासून प्रतिबंध लावला आहे. तर यापुढे व्यावसायिकांनी खर्रा पन्नी व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा समजून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा फतवाच काढला आहे. (शहर प्रतिनिधी)