शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसाने केली न.प.ची पोलखोल

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठवड्याभरा पुर्वी स्थानिक न.प. प्रशासनाने स्वच्छता अभियान राबवून लाखो रुपये खर्च केले.

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठवड्याभरा पुर्वी स्थानिक न.प. प्रशासनाने स्वच्छता अभियान राबवून लाखो रुपये खर्च केले. परंतु पहिल्याच पावसाने गोंदिया नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. घाणीच्या साम्राज्यावरून शहरवासीयांत असंतोषाचे वातावरण आहे.
दोन दिवसापर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील गल्लीबोळात घाण निर्माण झाली आहे. सर्वत्र नाल्यामध्ये केरकचरा तुडूंब भरल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने झालेला नाही. परिणामी सर्वत्र रस्त्यावर पाणी साचलेला दिसत आहे. एवढेच नव्हेतर रस्त्यावर घाणपाणी असल्यामुळे शहरात दुर्गंधीही पसरली आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने आठवड्याभरपूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबविला. या अभियानात लाखो रुपये खर्च करण्यात आले.
मात्र थातूर-मातूर स्वच्छता अभियान राबविल्यामुळे पहिल्याच पावसाने अभियानाची ‘पोलखोल’ केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. नगर परिषदेच्या सत्तेत काँग्रेस व राकाँ हे दोन्ही पक्ष आहेत. त् परंततु शहरात घाणीच्या साग्राज्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. न.प.चे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घाणीच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला हवे. मात्र त्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे. असाही आरोप केला जात आहे. जिल्ह्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुका जेव्हा होतात त्यावेळी मात्र जिल्हावासियांना आश्वासनाची खैरात वाटल्या जाते.
निवडणुका संपल्या नंतर मात्र एकाही लोकप्रतिनिधीला जनतेच्या समस्यांशी काहीच देणे घेणे नसते. दरवर्षी फक्त न.प. प्रशासनाकडून विविध अभियान राबविण्यास प्रशासन सज्ज राहाते, मात्र हे अभियान तात्पुरत्या स्वरूपाचे असते. पावसाळयाच्या दिससात कावीळ, मलेरिया, डायरिया या सारखे रोग पसरत असतात. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आरोग्य विभाग परिसरात स्वच्छता संदेश देत असते.
परंतु स्थानिक न.प. प्रशासनच स्वच्छतेकडे दुर्लक्षकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे, डॉक्टर मात्र अस्वच्छतेपासून निर्माण होणाऱ्या रोग व रूग्णांपासून लाखो रुपयाची कमाई करीत असतात. असे यंदातरी घडू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे.
शहरातील घाणीच्या गंभीर समस्येकडे गोंदिया शहरातील लोकप्रतिनिधी व न.प. प्रशासनाकडे लक्ष घालून अस्वच्छतेपासून शहराला मुक्त करावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत. गोंदियातील सर्वच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे नगर परिषदेने डासनाशक फवारणी करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)