निष्ठा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:21+5:30

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारी ते ६ मार्चपर्यंत एकूण ७ टप्प्यात करण्यात आले होते. २० ते २४ जानेवारीपर्यंत प्रत्येक तालुक्यातील १५० शिक्षकांचा पहिला टप्पा डायट तर्फे नियोजित करण्यात आला होता. मात्र २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांत सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

The first phase of loyalty training postponed | निष्ठा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा स्थगित

निष्ठा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा स्थगित

Next
ठळक मुद्देशिक्षक कृती महासंघाचा पाठपुरावा : आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्यावतीने (पुणे) जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी आयोजित निष्ठा प्रशिक्षण आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रशिक्षण २० जानेवारी ऐवजी २७ जानेवारीपासून होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारी ते ६ मार्चपर्यंत एकूण ७ टप्प्यात करण्यात आले होते. २० ते २४ जानेवारीपर्यंत प्रत्येक तालुक्यातील १५० शिक्षकांचा पहिला टप्पा डायट तर्फे नियोजित करण्यात आला होता. मात्र २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांत सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम व बालमेळावे यामध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यात शिक्षक, विद्यार्थी व पालक व्यस्त असतात. त्यात मधातच निष्ठा प्रशिक्षणाचा टप्पा आल्यामुळे अनेक शिक्षक व पालकांत रोष होता.
त्यामुळे २० जानेवारी पासून सुरु होणारा निष्ठाचा पहिला टप्पा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर घ्यावा यासाठी शिक्षक कृती महासंघ काही दिवसांपासून प्रयत्नात होते. यासाठी शनिवारी (दि.१८) जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षक समिती सभापती, शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य यांची भेट घेतली असता सगळा कार्यक्रम शिक्षण संचालकांनी ठरविला आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर हे नियोजन रद्द करता येणार नाही असे सांगण्यात आले. यावर शिक्षक कृती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अग्रवाल यांना भेटून आपली व्यथा मांडली असता त्यांनी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रशिक्षणाचा टप्पा पुढे हलविण्यासंदर्भात चर्चा केली.
पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून पहिला टप्पा स्थगित करून पुढे घेण्यात येईल असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले व तसे निर्देश डायट प्राचार्य रुद्रकार यांना दिले. यावेळी शिक्षक कृती महासंघाचे पदाधिकारी किशोर डोंगरवार, रवि अंबुले, संदिप तिडके, एस.यु.वंजारी, सुरेंद्र गौतम, महेंद्र सोनवाने, हेमंत पटले, राजकुमार बसोने, एन.बी.बिसेन, टी.आर.लिल्हारे, सुरेश कश्यप उपस्थित होते.

Web Title: The first phase of loyalty training postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक