पहिल्या दिवशी शिक्षक करणार काळीफीत लावून काम

By Admin | Updated: June 23, 2014 23:56 IST2014-06-23T23:56:50+5:302014-06-23T23:56:50+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारत काळ्याफिती लावून पहिल्या दिवशी निषेध

On the first day, the teachers will be able to work hard | पहिल्या दिवशी शिक्षक करणार काळीफीत लावून काम

पहिल्या दिवशी शिक्षक करणार काळीफीत लावून काम

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारत काळ्याफिती लावून पहिल्या दिवशी निषेध करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यावर जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. तर जूनच्या अखेर पर्यंत सर्व शिक्षकांचे वेतन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या पगारासंदर्भात शिक्षक समितीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासिनतेमुळे शिक्षकांचे पगार झाले नाही.
यामुळे जिल्हा परिषदेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने शाळेच्या पहिल्या दिवशी काळ्याफिती लावून काम करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल. यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, पी.आर. पारधी, संदीप तिडके, बी.जी. राठोड, डी.एल. गुप्ता, संजय बोपचे, आर. के. ठाकरे, वाय. बी. चव्हाण, पी.टी. रंगारी, संदीप खेडीकर, नरेश बडवाईक, विलास डोंगरे, टी.डी. जमईवार, राजकुमार बसोने यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: On the first day, the teachers will be able to work hard