शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे मुरूम वापरणाऱ्या कंपनीला दोन कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजन शून्य केले जात आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात चोरीचे मुरूम वापरण्यात आल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत जिल्हा प्रशासनाने या कंपनीवर दोन कोटी रूपयांचा दंड आकारला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजन शून्य केले जात आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात चोरीचे मुरूम वापरण्यात आल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत जिल्हा प्रशासनाने या कंपनीवर दोन कोटी रूपयांचा दंड आकारला आहे.देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. हे काम करताना देवरीपासून आमगावपर्यंच्या रस्त्यात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.रस्ता तयार करताना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकट माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. परिणामी वाहन चालकांचा अपघात होतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाऊस आल्याने आमगावच्या नाबार्ड बोर्डपासून धम्मगीरी या एक किमीच्या अंतरावर सायंकाळी ७ वाजतापासून १ जानेवारी २०२० च्या सकाळी ९ वाजता या १४ तासाच्या कालावधीत २० पेक्षा अधिक वाहन चालक पडले होते. या महामार्गाचे बांधकाम करताना वाटसरूंची येण्या-जाण्याचा रस्ता सोयीस्कर करूनच बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे होत नसल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ हजार ब्रास मुरूम तलावातून काढण्याची मंजुरी दिली आहे. परंतु या रस्त्यावर वापरण्यात येणारे मुरूम तलावातील नाहीत.तलाव खोलीकरण करून त्यातील मुरूम या ठिकाणी वापराव्यात अश्या जिल्हाधिकाºयांच्या सूचना होत्या. परंतु तसे न करता भलत्याच ठिकाणी खोदकाम करून मुरूम आणले जात आहे.२५ हजार ब्रास मुरूम वापरण्याची मंजुरी देण्यात आली. परंतु या ठिकाणी वापरण्यात आलेले मुरूम लाखो ब्रासच्या घरात आहे असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते.याची दखल घेत देवरी येथील तहसीलदार विजय बोरूडे यांनी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाºया एम.बी.पाटील कन्सट्रक्शन कंपनी लि. पुणे मार्फत गौरव गुप्ता रा. देवरी यांना १ कोटी ९९ लाख २ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे.५० हजार ब्रास मुरूमाचे विना परवाना उत्खननदेवरी तालुक्याच्या देवाटोला तलाठी सा.क्र.०५ हरदोली येथील गट क्र.२७७ आराजी १.७६ हे. आर. जागेमधून सन २०१८-१९ ते सन २०१९-२० या कालावधीसाठी १४ हजार ७०० ब्रास गिट्टी दगड उत्खनन करून वाहतूक करण्याचे परवाने काढले होते. मंडळ अधिकारी मुल्ला व तलाठी हरदोली यांनी १० जानेवारी रोजी तयार केलेल्या अहवालानुसार गट क्र. २७७ आराजी १.७६ हे. आर.जागेमधील उत्खनन १ लाख ८२ हजार ४०९ घन मीटर एवढे मुरूम काढले. ४९ हजार ७५५ ब्रास मुरूम विना परवनागीने काढल्याने त्यांच्यावर १ कोटी ९९ लाख २ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.३० दिवसात दंड न भरल्यास दंड होणार १२ कोटी४एम.बी.पाटील कन्सट्रक्शन कंपनी लि.पुणे मार्फत गौरव गुप्ता रा.देवरी यांना १ कोटी ९९ लाख २ हजार रूपयाचा दंड १४ जानेवारी २०२० ला ठोठावला आहे. हा दंड ३० दिवसाच्या आत न भरल्यास या कंपनीला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये, बाजारभाव मुल्य दर स्वामीत्वधनाचे पाच पट दंड व स्वामीत्वधनाचे ४०० रूपये प्रतीब्रास असे एकूण ११ कोटी ९४ लाख १२ हजार रूपये भरावे लागतील.