हमीभाव मिळत नसल्याने बारीक धानाचे लागवड क्षेत्र झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:18+5:30

पूर्व विदर्भात सर्वाधिक १७ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते.पूर्व विदर्भात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान पिकांसाठी अनुकुल मानला जातो. तर एचएमटी, श्रीराम, पीएनआर यासारख्या बारीक पोत असलेल्या धानाला बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. मात्र मागील सात आठ वर्षांपासून बारीक आणि जाड पोत असलेल्या धानाला सारखाच हमीभाव मिळत आहे.

Fine paddy cultivation area has become less due to lack of guarantee | हमीभाव मिळत नसल्याने बारीक धानाचे लागवड क्षेत्र झाले कमी

हमीभाव मिळत नसल्याने बारीक धानाचे लागवड क्षेत्र झाले कमी

googlenewsNext
ठळक मुद्दे७० वरुन ३० टक्यांवर आले क्षेत्र : शासकीय धान खरेदीत वाढ, या हंगामात ३५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सात आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यात श्रीराम, एचएमटी, पीएनआर यासारख्या बारीक पोत असलेल्या धानाची सर्वाधिक म्हणजे ७० टक्के लागवड केली जात होती. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत नव्हती. मात्र बारीक पोत असलेल्या धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता जाड म्हणजे १०१० प्रजातीच्या धानाची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बारीक धानाचे लागवड क्षेत्र ७० टक्यावरुन आता ३० टक्यांवर आल्याची बाब पुढे आली आहे.
पूर्व विदर्भात सर्वाधिक १७ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते.पूर्व विदर्भात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान पिकांसाठी अनुकुल मानला जातो. तर एचएमटी, श्रीराम, पीएनआर यासारख्या बारीक पोत असलेल्या धानाला बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. मात्र मागील सात आठ वर्षांपासून बारीक आणि जाड पोत असलेल्या धानाला सारखाच हमीभाव मिळत आहे. तर बारीक पोत असलेल्या धानाचा लागवड खर्च आणि जोखमी अधिक आहे. तर धानाच्या लागवड खर्चात दरवर्षी दोन तीन हजार रुपयांनी वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याने आता शेतकºयांनीच बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करणे कमी केले आहे.त्यामुळे ७० टक्केवरुन हे क्षेत्र एकदम ३० टक्यावर आले आहे.जाड पोत असलेल्या १०१० या प्रजाती सारख्या जाड धानाची लागवड गोंदियासह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात अधिक प्रमाणात केली जात आहे.त्यामुळे यंदा कधी नव्हे तेवढ्या ३० लाख क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आली. शासकीय धान खरेदी केंद्रावर अचानक वाढलेल्या आवक मुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला सुध्दा आश्चर्य वाटले. त्यांनी याची खोलात जाऊन चौकशी केली असता बारीक पोत असलेल्या धानाला १८०० ते दोन हजार रुपये प्रती क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत नसल्याने शेतकºयांनी त्याला पर्याय म्हणून जाड पोत असलेल्या १०१० सारख्या धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ केल्याचे पुढे आले आहे.
विशेष म्हणजे १०१० प्रजातीच्या धानाला १७५० रुपये हमीभाव मिळत असून तोच दर बारीक पोत असलेल्या धानाला मिळत आहे. त्यामुळे या धानाची लागवड करणे शेतकºयांनी बंद केल्याची बाब पुढे आली आहे.

१८१५ रुपये हमीभाव
या खरीप हंगामातील धानासाठी शासनाने १८१५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.याच दरानुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जाणार आहे.मात्र मिळत असलेला हमीभाव हा लागवड खर्चाच्या तुलनेत फारच कमी असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे.

यंदा ३५ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. मागील वर्षी एकट्या गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३० लाख क्विंटल म्हणजे ६०० कोटी रुपयांची धान खरेदी केली होती. यंदा यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून ३५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज या विभागाने वर्तविला आहे.
उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव कधी?
शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली येत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Fine paddy cultivation area has become less due to lack of guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.