शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निवडणुकीत लागल्या बसगाड्या

By admin | Updated: October 14, 2014 23:19 IST

पैसे दिल्याशिवाय बसगाड्या देणार नाही, अशी भूमिका घेणारे एसटी महामंडळ अखेर नरमले आणि त्यांनी विनातक्रार आपल्या बसगाड्या निवडणूक यंत्रणेच्या सेवेत दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक

गोंदिया : पैसे दिल्याशिवाय बसगाड्या देणार नाही, अशी भूमिका घेणारे एसटी महामंडळ अखेर नरमले आणि त्यांनी विनातक्रार आपल्या बसगाड्या निवडणूक यंत्रणेच्या सेवेत दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाला एसटी महामंडळाच्या बसेसचा लाभ व निवडणूक विभागाकडून एसटी महामंडळाला ेआर्थिक लाभ मिळणार आहे.प्रत्येक निवडणुकीत मनुष्य बळ व मतदान मशीन पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाशी करार करून बसेस पुरविल्या जातात. मात्र निवडणूक विभागाकडून ठराविक कालावधीत किंवा निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत महामंडळाला पेमेंट केले जात नाही. तसेच कधी अग्रीम रक्कमसुद्धा जमे केले जात नाही. गोंदिया आगाराने लोकसभा निवडणुकीत अग्रीम रक्कम न मिळाल्यावरही बसेस पुरविल्या होत्या. त्यावेळच्या उर्वरित रकमेचा शेवटचा हप्ता आता विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवसांपूर्वी मिळाला. याशिवाय सन २०१० मधील ग्रामसभा निवडणुकीत बसेस दिल्याची रक्कम अद्यापही न मिळाल्याने गोंदिया आगाराने आधी पेमेंट करा, तेव्हाच बसेस पुरवू अशी भूमिका घेतली होती व आगारप्रमुख गौतम शेंडे आपल्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकाराने निवडणूक विभागाची तारांबळ उडाली होती.याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच निवडणूक अधिकाऱ्यांनी गोंदियाचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्याशी चर्चा केली. चर्चेत गोंदिया उपविभागासाठी व देवरी उपविभागासाठी पुरविण्यात येणाऱ्या बसेससाठी अग्रीम रक्कम म्हणून प्रत्येकी साडे तीन लाख देण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे एसटी महामंडळाने नमते घेवून निवडणुकीच्या कामासाठी बसेस पुरविण्याचे मान्य केले.