शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्यांना फेडरेशनने नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

तालुक्यात एकूण सहा शासकीय धान खरेदी केंद्र आहे. यातील तिगाव धान केंद्रावर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने ते केंद्रावर तसेच उघड्यावर पडून होते. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून अनेकदा परत पाठविले. मात्र शेतकऱ्यांनी आज तरी काटा होईल अशी होती. पण याच दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने केंद्रावर असलेले ५० ते ६० शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात भिजले.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने भिजले धान : केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील तिगाव येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील २० ते २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणले आहे. मात्र केंद्रावरील ग्रेडर आणि कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून या शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यात एकूण सहा शासकीय धान खरेदी केंद्र आहे. यातील तिगाव धान केंद्रावर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने ते केंद्रावर तसेच उघड्यावर पडून होते. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून अनेकदा परत पाठविले. मात्र शेतकऱ्यांनी आज तरी काटा होईल अशी होती. पण याच दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने केंद्रावर असलेले ५० ते ६० शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात भिजले. काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले. शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. धान भिजल्यामुळे पाखड झाले असून हा धान खरेदी करण्यास आता केंद्रावरील कर्मचारी नकार देत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. केंद्रावर पडून असलेल्या धानाचा त्वरीत काटा करावा, अन्यथा या विरोधात केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड