शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

कोरोनाच्या भीतीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांची भर पडत आहे. साधारण ताप, खोकला व सर्दी झाली तरी कोरोनाची लागण तर झाली नसावी या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. ही नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबीर घेणे गरजेचे वाटत आहे.

ठळक मुद्देसर्दी, खोकला व तापाची साथ : रूग्णांची संख्या वाढल्याने चिंता

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण होवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या भीतीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांची भर पडत आहे. साधारण ताप, खोकला व सर्दी झाली तरी कोरोनाची लागण तर झाली नसावी या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. ही नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबीर घेणे गरजेचे वाटत आहे.वास्ताविक बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सहज ताप, खोकला व सर्दी यासारखे आजार बळावतात.अशात नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सप्टेंबर महिन्यात कधी पाऊस तर कधी उन्ह असा खेळ सुरु होता.या दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होवून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.सामान्य ताप, खोकला व सर्दी असणाºया रुग्णांनी घाबरुन जाण्याची गरज नाही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून औषधोपचार करावा असे डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.लॉकडाऊन शिथील झाल्यापासून हॉटेल व टपºया सुरु झाल्या आहेत. अशात नागरिकांनी उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात करिता पाणी उकळून प्यावे, सुदृढ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, हात नेहमी धूत राहून स्वच्छ ठेवावे, ताप, सर्दी व खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करु नये असे वैद्यकीय अधिकारी डॉ.मंडल यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या