शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ममता सुपर बाजारवर एफडीएची कारवाई

By admin | Updated: March 4, 2015 01:20 IST

शहरातील ममता सुपर बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

गोंदिया : शहरातील ममता सुपर बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी येथून खाद्य पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर ममता सुपरबाजारच्या संचालकांकडे रजिस्ट्रेशन व पॅकिंगचा परवाना नसल्याचे आढळले असून त्यावर त्यांना प्रशासनाने नोटीस बजावले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून १ मार्च रोजी रात्री ८ वाजता ही कारवाई करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती डॉ.अशू सैनी यांनी मुख्य बाजार भागात असलेल्या ममता सुपरबाजारमधून हल्दीरामचे खाद्यपदार्थ व मसूर दाळ खरेदी केली होती. घरी गेल्यावर त्यांना त्यात बुरशी आढळून आली. यावर त्यांनी सुपर बाजारच्या संचालकांना विचारणा केली असता त्यांनी चूक मान्य न करता हुज्जत घातली. यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी सहायक आयुक्त (अन्न) बी.जी. नंदनवार यांना दुकानातील साहीत्य व कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, नंदनवार यांनी अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.टी.घंवर, तहसीलदार संजय पवार तसेच वजन व माप विभागांच्या निरीक्षकांसह १ मार्च रोजी रात्री ८ वाजता दरम्यान ममता सुपरबाजारवर कारवाई केली. कारवाई दरम्यान त्यांना सुपरबाजारमध्ये मागील दीड वर्षांपासून पॅकिंग केली जात असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी दुकानाचे रजिस्ट्रेशन व पॅकींगचा परवाना मागीतला. मात्र दुकान संचालकांकडे ते नव्हते. यावर नंदनवार यांनी दुकानातून खाद्य पदार्थांचे न नमुने घेतले असून ते मुंबईला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तर ममता सुपर बाजारच्या संचालकांना दुकान दोन-तीन दिवस बंद ठेवण्याचे मौखीक आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ममता सुपर बाजारच्या संचालकांपासून परिसरातील अन्य व्यवसायीही त्रस्त असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)