शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वन कायद्यात अडकले १८ सिंचन प्रकल्प शेतकरी हवालदिल

By admin | Updated: May 11, 2014 23:47 IST

गोंदिया शेतकरी दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. सिंचनाअभावी पुरेसे उत्पन्न घेण्यापासून तो मुकतो. परिणामी दिवसेंदिवस शेतकर्‍याची हालत खस्ता होत आहे.

: १५०० एकर शेती सिंचनापासून वंचित

नरेश रहिले - गोंदिया शेतकरी दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. सिंचनाअभावी पुरेसे उत्पन्न घेण्यापासून तो मुकतो. परिणामी दिवसेंदिवस शेतकर्‍याची हालत खस्ता होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील १८ प्रकल्प वन विभागाच्या जमिनीवर आहे. त्यामुळे बरीच शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. वनकायद्याच्या आडकाठीमुळे हे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षापासून रखडले आहेत. मध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे, कनिष्ठ स्थानिक स्तर यामार्फत येणारे १८ प्रकल्प वन जमिनीवर आहेत. ज्या ठिकाणी शासनाने सिंचन प्रकल्प तयार करण्याचे ठरविले, ती जमीन वन विभागाची असल्याने या जमिनीवर प्रकल्प तयार करण्यासाठी सिंचन विभागाला आडकाठी येत आहे. मात्र वनविभाग या सिंचनासाठी अडसर होऊ नये म्हणून शासनातर्फे या प्रकल्पांसाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रियेचा पाठपुरावा सिंचन विभागाने केला नाही. सिंचनाचे काम करणार्‍या विविध विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यातील १८ प्रकल्पांचे काम थोडेही पुढे सरकले नाही. जांभळी प्रकल्प वन जमिनीच्या १०.८९ हेक्टर परिसरात उभारायचा आहे. तेढा १०. ८५ हेक्टर, येडमागोंदी १५.६३ हेक्टर, आलेबेदर ५.०९८ हेक्टर, धवलखेडी ८.८५ हेक्टर, जांभळी गंधारी प्रकल्पासाठी १९.३० हेक्टर, हलबीटोला ४.८५ हेक्टर, नवाटोला २.१८ हेक्टर, कन्हारपायली १४६.९८ हेक्टर, ओवारा .६० हेक्टर, चिमनटोला १२.०४हेक्टर, मंगेझरी ९.९२ हेक्टर, नवाटोला १२.०४ हेक्टर, मंगेझरी ९.९२ हेक्टर, चिमनटोला १२.०४ हेक्टर, मंगेझरी ९.९२ हेक्टर, नवाटोला ७९.१३ हेक्टर, चुटीया १४.६४ हेक्टर, सातबहिणी २३१.२८, तुमळीमेंढा ५.१८ हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. मात्र सिंचन विभागाच्या उदासीनतेमुळे हे प्रकल्प रखडलेले आहेत. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी वन विभागाकडे कोणताही पाठपुरावा न करता सिंचन विभागाचे अधिकारी आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या डोक्यावर फोडत आहेत.