शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

एस्कलेटर व रॅम्पचे काम प्रलंबित

By admin | Updated: April 21, 2015 00:40 IST

वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पची सोय करण्यात येणार होती.

गोंदिया रेल्वेस्थानक : वृद्ध व अपंगांची गैरसोयगोंदिया : वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पची सोय करण्यात येणार होती. तसे प्रस्तावसुद्धा मंजूर करण्यात आले. मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे, आता या सुविधेपासून गोंदिया रेल्वे स्थानक वंचित ठरत आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांनी एप्रिल किंवा मे महिन्यापासून एस्कलेटर व रॅम्पची सुविधा गोंदिया स्थानकात सुरू होणार, असे डिसेंबर २०१४ मध्येच सांगितले होते. मात्र एप्रिल महिना लोटत असतानाही या संबंधात कसल्याही कामाचा शुभारंभ करण्यात आला नाही. आता ड्रार्इंगमध्ये काहीतरी चुका असल्याचे सांगून हे कामच प्रलंबित ठेवण्यात आल्याचे गोंदिया स्थानक व्यवस्थापक कार यांनी सांगितले. जोपर्यंत ड्रार्इंगमधील चुका दुरूस्त करण्यात येणार नाहीत, तोपर्यंत गोंदिया स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पच्या कामाचा शुभारंभ होवू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराने वृद्ध व अपंग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया स्थानक एक महत्वपूर्ण स्थानक आहे. दररोज जवळपास २० हजार प्रवाशी येथून आपला प्रवास करतात, तर एवढेच प्रवाशी या स्थानकावर उतरतात. शिवाय या रेल्वेमार्गावरील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे गोंदिया स्थानक आहे. परंतु एस्कलेटर व रॅम्पची सोय करून देण्याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)