सायकल रॅलीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश

By Admin | Updated: February 8, 2016 01:51 IST2016-02-08T01:51:57+5:302016-02-08T01:51:57+5:30

सारस महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.५) शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Environmental safeguards from cycle rally | सायकल रॅलीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश

सायकल रॅलीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश

सारस महोत्सवाचे निमित्त : जिल्हाधिकारी झाले सायकलवर स्वार
गोंदिया : सारस महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.५) शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. विशेष म्हणजे स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी सायकलवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी झाले होते.
दुर्मिळ व नामशेष होत चाललेला सारस हा पक्षी केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळत असल्यामुळे ऐश्वर्यसंपन्न सारस व अन्य पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सारस फेस्टिवलच्या माध्यमातून एक लोकचळवळ चालविली जात आहे. यांतर्गत गुरूवारी (दि.५) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेल्या रॅलीचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, शशिकुमार मीणा, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन यांनीही या रॅलीत सहभाग घेतला.
ही रॅली केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथून नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक मार्गाने मार्गक्रमण करीत केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समाप्त झाली. रॅलीत संत तुकाराम हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नगर परिषद कन्या शाळा आणि राजस्थान कन्या शाळा येथील शेकडो विद्यर्ा्थ्यांनी भाग घेतला होता. रॅलीत सारस व वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. सारस पक्ष्याचा वेश परिधान केलेले मुन्नालाल यादव सायकल रॅलीचे आकर्षण होते.
या सायकल रॅलीत वन्यजीवप्रेमी मुकुंद धुर्वे, रु पेश निंबार्ते, त्र्यंबक जारोदे, रवि गोलानी, राजू खोडेचा, अनिल भगचंदानी तसेच रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, लागवड अधिकारी कुंभलकर, डॉ. विजय ताते यांचेसह विविध शाळांचे शिक्षकवर्ग सायकल रॅलीत सहभागी होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता विशद केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Environmental safeguards from cycle rally