शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या विसाव्यासाठी वृद्धांची धडपड सुरूच

By admin | Updated: September 30, 2014 23:37 IST

वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. हे वृद्धत्व अनेकांसाठी एकाकीपणा आणणारे असते. हा एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते

गोंदिया : वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. हे वृद्धत्व अनेकांसाठी एकाकीपणा आणणारे असते. हा एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची. अशी सोबत करण्यासाठी गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहे. पण त्यांना विसावा घेण्यासाठी, दोन क्षण निवांत बसण्यासाठी हक्काची जागाच नाही. गोंदियातील ज्येष्ठ नागरिक संघ सध्या यासाठी धडपड करीत आहे.ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला या संघाचे सचिव शांतीलाल दखने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरातील सुभाष गार्डनमध्ये आम्ही एकत्र येत होतो. त्याच ठिकाणी आमच्या बैठकाही होतात. पण काही दिवसांपासून नगर परिषदेने त्या ठिकाणी क्लब सुरू केला. त्यामुळे आम्हाला हक्काची अशी कोणतीच जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व बैठकीसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाई गंगाबाई महिला रूग्णालयामागील २० हजार चौ.फू. जागेतून ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीसाठी जागा मंजूर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने याच ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष निलकंठ ब्राह्मणकर यांनी सांगितले आहे.राज्य सरकारने फेडरेशन आॅफ सिनीअर सिटीझन्स आॅर्गनायजेशन महाराष्ट्र (फेस्कॉम) यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे काम करीत आहे. हा संघ ज्येष्ठ नागरिकांचे कागदपत्र तपासून त्यानुसार अर्ज व ओळखपत्र तहसीलदारांकडे पाठवितात. त्यावर तहसीलदारांची स्वाक्षरी झाली की त्या नागरिकांना शासनाच्या विविध सोयीसुविधांचा लाभ घेता येतो. बुधवारी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त फेस्कॉमची बैठक ३ वाजता सुभाष गार्डनमध्ये होणार आहे.