शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गेश्वरीने आत्महत्याच केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:22 IST

पोलीस ठाण्यांतर्गत ढिवरटोला (सावंगी) येथील २७ वर्षीय विवाहिता दुर्गेश्वरी खनोज भगत हिने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

उत्तरीय तपासणीत निष्पन्न : वडिलांनी केला होता हत्येचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : पोलीस ठाण्यांतर्गत ढिवरटोला (सावंगी) येथील २७ वर्षीय विवाहिता दुर्गेश्वरी खनोज भगत हिने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह नदीत उडी घेवून आत्महत्या केली. पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला, असे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. १७ जुलै रोजी दुर्गेश्वरी खनोज भगत आणि तिचा सहा महिन्यांचा चिमुकला जितू खनोज भगत हे दोघेही नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती. पाच तासांच्या शोधानंतर दोन्ही आई-लेकाचे मृतदेह वाघनदीत सापडले. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परंतु दुर्गेश्वरीचे वडील गोर्रे येथील लोकचंद मुन्नालाल कटरे यांनी मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली, असा आरोप दुर्गेश्वरीच्या पतीसह कुुटुंबातील मंडळीवर लावला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास कार्य सुरू ठेवले होते. २१ जुलैला उत्तरीय तपासणी अहवाल ग्रामीण रूग्णालयाने दिला. त्यानुसार दुर्गेश्वरीने आपल्या मुलासह नदीत उडी मारुन आत्महत्या केली. १८ जुलैला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढली होती. त्यामुळे ते दोघे काही अंतरापर्यंत वाहून गेले होते.