शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

धानासह विविध पिकांवर किडींच्या प्रकोपाने भरली धास्ती

By admin | Updated: October 30, 2014 22:53 IST

गोंदिया तालुक्यातील गर्रा, सावरी, लोधीटोला, घिवारी, पांढराबोडी व जवळच्या अनेक गावांमध्ये शेतकरी धानपिकांसह विविध भाजीपाल्याचे पीक घेतात. पण सध्या वातावरणात बदल होत

खातिया : गोंदिया तालुक्यातील गर्रा, सावरी, लोधीटोला, घिवारी, पांढराबोडी व जवळच्या अनेक गावांमध्ये शेतकरी धानपिकांसह विविध भाजीपाल्याचे पीक घेतात. पण सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे सर्वच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला असून या क्षेत्रातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. वातावरणात बदलामुळे धानपिकावर अळींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरी विविध किटनाशक औषध फवारणीसाठी महागड्या किटनाशक औषधीचा वापर करत आहेत. अशी परिस्थिती भारी धानाच्या पिकावर दिसत आहे. गोंदिया तालुक्याच्या काही भागात शेतकरी धानाच्या पिकाबरोबरच भेंडी, बरबटी, वांगे, भेंदरे, गोबी, कारल्या, मुळा व विविध प्रकारच्या भाज्यांचीही लागवड करतात. पण सध्या वातावरणामध्ये बदल आल्यामुळे या सर्व भाजीपिकांवर विविध प्रकारचे अळ्या तयार होऊन भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागणार आहे. मागील महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांना पावसाच्या कमी प्रमाणामुळे हलक्या धानाचे पीक काळताना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आणि आता वातावरणात झालेल्या बदलामुळे भारी धानावर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने ‘आमदनी अठनी, खर्चा रुपया’ अशी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. शासनाच्या वतीने या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध रोगांपासून आपल्या पिकांना कसे वाचवता येईल व त्यासाठी कोणती उपाययोजना करावी, गावागावात शिबिरे घेवून जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना निराशेकडून आशेकडे वळविण्यासाठी कमी दरामध्ये शेतकऱ्यांना विविध किटनाशक औषधींचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)