काळी-पिवळी मालकांच्या भांडणामुळे वाहतूक बंद

By Admin | Updated: June 11, 2014 23:20 IST2014-06-11T23:20:42+5:302014-06-11T23:20:42+5:30

आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन

Due to black-yellow owners' dispute, stop the traffic | काळी-पिवळी मालकांच्या भांडणामुळे वाहतूक बंद

काळी-पिवळी मालकांच्या भांडणामुळे वाहतूक बंद

आमगाव : आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन दिवसांपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे रखरखत्या उन्हाळ्यात हाल होत आहेत. यावर प्रशासनामार्फत कोणताच तोडगा न निघाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
आमगाव-गोंदिया मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमगाववरून गोंदिया येथे विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय व खाजगी न्यायालयीन कामाकरीता जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर ४० ते ४५ काळी-पिवळी टॅक्सी गाडी चालत आहे. मात्र नगरातील नविन जैन यांच्या मालकीच्या दोन काळी-पिवळी चालत आहेत. त्यात पुन्हा दोनमध्ये एक गाडी वाढवून तिन गाड्या जैन यांनी चालू केल्यामुळे इतरांकडे ज्या एक-एक गाड्या आहेत. त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. याचे आर्थिक भुर्दंड मालकावर बसत आहे. त्यामुळे सतत तीन दिवसांपासून काळी-पिवळी संघटनेच्यावतीने आमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रवाशांकरिता सुरू असलेल्या एसटीच्या गाड्या कमी झाल्याने प्रवाशांचे भर उन्हाळ्यात ेहाल झाले आहेत.

यात काळी-पिवळी संघटनेने पोलीस निरीक्षक यांचे सोबत बैठक घेतली मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. आता गोंदिया येथील रस्ता वाहतूक अधिकारी यांना भेटून मार्ग काढण्याचा काळी-पिवळी संघटनेचा संकल्प आहे. या मार्गावरील वाहतूकी संदर्भात जैन याना विचारले असता माझ्या दोन गाड्या आहेत. त्याची कागदपत्र बरोबर आहेत. तिसऱ्या गाडीबाबत जो आरोप लावला जात आहे तो बिनबुडाचा आहे. तिसऱ्या गाडीवर माझ्याकडून बंद झालेला चालक शोभेलाल याच्या मालकीची आहे. त्या गाडीला नोंदणीकृत संघटनेने परवानगी दिली आहे. जर सदर काळी-पिवळी संघटनेने माझ्या चालत असलेल्या गाड्या बंद करण्याचा प्रयत्न केला तर मी न्यायालयात जाणार अशी प्रतिक्रीया जैन यानी व्यक्त केली. एकंदरीत काळी-पिवळीच्या भांडणात या मार्गावरील वाहतूक बस सोडून बंद असल्याने प्रवाशांचे बेहाल झाले आहे. यात पोलीस विभाग व जिल्ह्यातील वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. अशात त्वरीत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to black-yellow owners' dispute, stop the traffic