जनजागृतीमुळे हत्तीरोगावर बसू लागलाय आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:51+5:30

हत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅक्रोटी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डासामार्फत होत असतो. हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरिया) हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जाते. त्यानंतर जंतू स्वत: ५ जखम छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दूषीत डास वारंवार चावल्यावर काही व्यक्तींनाच हत्तीरोग या आजाराची लागण होते.

Due to awareness, elephants are starting to get sick | जनजागृतीमुळे हत्तीरोगावर बसू लागलाय आळा

जनजागृतीमुळे हत्तीरोगावर बसू लागलाय आळा

Next
ठळक मुद्दे२०१९ मध्ये २०६७ रुग्ण : ४५८ रूग्ण कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हत्तीरोग हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने रूग्ण दगावत नसला तरी त्याला अत्यधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा होत नसल्याने रूग्णांची त्यातून सुटका होत नाही. आरोग्य विभागाच्यावतीने १६ ते ३१ आॅगस्ट २०१९ या वेळेत हत्तीरोग रुग्णांची तपासणी मोहीम चालविण्यात आली. यात दोन हजार ६७ रुग्ण आढळून आले. रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने आता २ मार्चपासून सामूहिक औषधोपचार मोहीम (एमडीए) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय हत्तीरोग नियंत्रणासाठी ब्रम्हास्त्र ठरत आहे.
ग्रामीण भागात २ ते ७ मार्च, शहरी क्षेत्रात २ ते १२ मार्च पर्यंत सामूहिक ओषधौपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान आरोग्य कर्मचारी व आशा सेविका घराघरात जावून हत्तीरोग नियंत्रण औषधीचे डोज देणार आहेत. मोहिमेला यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सन २०१९ या वर्षात हत्तीरोग रुग्ण तपासणी अभियानात गोंदिया तालुक्यात ३५१, तिरोडा २६९, गोरेगाव २७६, आमगाव १३९, देवरी १३९, सालेकसा ६४, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात ३४३ अशा प्रकारे दोन हजार ६७ रुग्ण आढळले होते. डॉ. चौरागडे यांनी सांगितले की, डासांच्या चावल्यामुळे हत्तीरोगाचे लक्षण दिसून येत नाही. परंतु डासांच्या माध्यमातून जंतू शरीरात गेल्यावर याची लक्षणे दिसतात. यात ६ ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो. हत्तीरोग नियंत्रण करिता आरोग्य विभाग नागरिकांच्या घरापर्यंत जावून गोळ्या वितरित करीत आहेत. सांगण्यात येते की आरोग्य कर्मचारी नागरिकांना हत्तीरोगवर मार्गदर्शन करून नागरिकांना गोळ्या सेवन करायला लावणार आहे.

हत्तीरोग होण्याची ही आहेत कारणे
हत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅक्रोटी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डासामार्फत होत असतो. हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरिया) हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जाते. त्यानंतर जंतू स्वत: ५ जखम छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दूषीत डास वारंवार चावल्यावर काही व्यक्तींनाच हत्तीरोग या आजाराची लागण होते. मादी जंतू लाखो लहान जंतूंना जन्म देते. ते रात्रीच्यावेळी रूग्णाच्या रक्तप्रवाहात फिरतात आणि नंतर डास चावल्याने दुसºया व्यक्तीकडे प्रसारीत होते.
या करा उपाययोजना
डासांची संख्या कमी करणे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, घाण व कचºयाची विल्हेवाट लावावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, घरातील सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करावीत, एक दिवस चांगले उन्हात वाळवावे, पाणी साठवलेली भांडी योग्य झाकून ठेवावीत, फुलदान्या, झाडांच्या कुंड्यातील पाणी व कुलरमधील पाणी नियमित बदलावे तसेच मच्छरदाण्यांचा वापर करावा.

Web Title: Due to awareness, elephants are starting to get sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य