शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसायातून खोसेटोल्यात अवतरली दूधगंगा

By admin | Updated: October 15, 2015 02:00 IST

धानाचे कोठार म्हणून ख्यातीप्राप्त गोंदिया जिल्ह्यात शेतकरी वर्षानुवर्षापासून धानाचे पारंपरिक पिक घेतात.

गोंदिया : धानाचे कोठार म्हणून ख्यातीप्राप्त गोंदिया जिल्ह्यात शेतकरी वर्षानुवर्षापासून धानाचे पारंपरिक पिक घेतात. पण केवळ त्यावर अवलंबून राहिल्याने आर्थिक उन्नती साधने शक्य नसल्याचे ओळखून अनेक शेतकरी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. याचाच भाग म्हणून गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. शासनाकडून त्यांना दुधाळ गायी पुरविण्यात आल्या. आज महिन्याकाठी येथील शेतकरी ७.९२ लाखांचे उत्पन्न दुधाच्या व्यवसायातून घेत आहेत. गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला हे १६३ उंबरठ्याचं आणि अवघ्या ८०९ लोकवस्तीचं आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती. या गावातील २९४ हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेतीचा कार्यक्रम खोसेटोल्यात प्रभावीपणे राबविण्यात आला आणि पाहता पाहता या गावाचे चित्रच बदलले. खोसेटोल्यातील ६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ८८ जर्सी आणि होस्टन जातीच्या दुधाळ गायींचे वाटप केले. गावातील बहुतांश शेतकरी खरीपाच्या हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून धान शेती करीत असल्याने त्यांचे उत्पन्नही मर्यादित होते. पण आता या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने त्यांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळून भक्कम असा आर्थिक आधार मिळाला आहे.परिश्रम करण्याची तयारी असली की यश नक्की मिळतं, हे येथील शेतकऱ्यांनी सिद्ध करुन दाखविले. गावातील शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या नवीन व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेतले. एका गायीपासून इथला शेतकरी दोन्ही वेळेच सरासरी १५ लिटर दूध घेतो. तीन सहकारी आणि दोन खासगी अशा पाच संस्था दुध संकलनाचे काम करतात. दुधाला प्रतिलिटर २० रुपये दर या संस्था देतात. दररोज १३२० लिटर दुधाचे संकलन खोसेटोल्यात करण्यात येते. २६ हजार ४०० रुपयांचे उत्पन्न दररोज तर महिन्याकाठी ७ लक्ष ९२ हजार रुपयांचे उत्पन्न दुधापासून येथील गावकऱ्यांना मिळते. एका गायीच्या दुधापासून महिन्याकाठी ९ हजार रुपयांचे उत्पन्न होत असून चाऱ्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी ६ हजार रुपये शुद्ध नफा एका गाईपासून शेतकऱ्यांना मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गावकरी झाले व्यसनापासून दूरखोसेटोल्यातील शेतकऱ्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायाला वाहून घेतल्यामुळे गावातील आबालवृद्ध व्यसनापासून दूर आहेत. गावात प्रवेश करतेवेळी साधी पानटपरीसुद्धा दिसत नाही. दुधाळ जनावरांच्या आहार व आरोग्याकडे खोसेटोल्यातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष आहे. कारण गायम म्हणजे कामधेनू आहे. भविष्यात येथील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यातून गावकऱ्यांची निश्चितपणे सामाजिक व आर्थिक प्रगती होणार हे दिसून येत आहे.रासायनिक खताचा खर्च वाचलापाळीव दुधाळ जनावरांपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होत असल्यामुळे शेतीसाठी नियमित शेणखताचा वापर होत आहे. त्यातून रासायनिक खताचा वापर फारच कमी प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे तो खर्चही वाचत आहे. शेणखताच्या वापरामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढली असून शेतजमिनीचा पोतही कायम आहे.