शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

औषध निर्माते जाणार बेमुदत संपावर

By admin | Updated: June 23, 2014 00:08 IST

आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटना आपल्या

आजपासून आंदोलन : केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करा
गोंदिया : आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटना आपल्या आंदोलनाची सुरूवात सोमवारपासून (दि.२३) करीत आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास ३० जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सदर संघटनेने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा सन २००९ प्रमाणे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर संप राज्यस्तरावर होणार असून राज्यातील सर्व जिल्ह्यात शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेच्या सर्व शाखा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करणार आहे. या संघटनेची गोंदिया शाखा सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. यानंतर २५ जून रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन व त्यानंतरही शासनाने संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास ३० जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सदर संघटनेने कळविले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ९ जुलै २००९ रोजी सदर संघटनेने आपल्या मागण्यांसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व १५ जुलै २००९ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सचिव यांनी त्यांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यावेळी संप मागे घेण्यात आला होता. मात्र आजपावेतो मागण्यांची शासकीय पातळीवर आश्वासनांच्या पूर्तीबाबत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सन २००९ पासून मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानेच सदर संघटनेने आता बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
जिल्ह्यात ३९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतील ३९ औषध निर्माते, सहा ग्रामीण रूग्णालयातील औषध निर्माते, याशिवाय केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील सर्व नियमित व कंत्राटी औषध निर्माते या संपात सहभागी होणार आहेत.
त्यांच्या मागण्यांमध्ये सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माण अधिकारी संवर्गास केंद्र शासनाच्या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ पासून प्रारंभिक वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. औषध निर्माण अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी नाहीत, त्यांना पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध कराव्यात, फॉर्मसी अ‍ॅक्ट १९४८ कलम ४२ चे उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदांची पुनर्निर्मिती करून पूर्ववत दोन पदे कायम करावी, सेवा प्रवेश नियम अद्ययावत करावे, औषध निर्माण अधिकाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी सेवेत कार्यरत असताना केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेला बी.फॉर्म. कोर्स लागू करावा, एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांना सात हजार ऐवजी २० हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे तसेच एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांना अनुभवाच्या आधारे नियमीत पदावर नियुक्तीमध्ये सरसकट प्राधान्य द्यावे किंवा रिक्त पदी त्यांचा समावेश करावा या व इतर मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)