शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना जातीव्यवस्थेत मर्यादित ठेवू नका

By admin | Updated: March 25, 2017 01:45 IST

देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये.

पोवारीटोला येथे बलिदानदिन : भेरसिंह नागपुरे म्हणाले, शहिदांचे कार्य चिरकाल स्मरणात राहणारे सालेकसा : देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये. शहिदांनी आपले सर्वस्व त्यागून देश व नागरिकांचा त्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. त्यामुळे समाज व जातीव्यवस्थेच्या पलिकडे विचार करून त्यांच्याप्रती आदर व सन्मान ठेवावे, असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केले. सन १८५७ च्या प्रथम स्वातंत्र संग्राम सेनानी विरांगना अवंतीबाई लोधी यांची पुण्यतिथी पोवारीटोला (कोटजंभुरा) येथे त्यांच्या पुतळ्यासमोर पार पडली. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त नागरिकांना ते संबोधित करीत होते. अध्यक्षस्थानी यादनलाल बनोठे होते. उद्घाटन माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी केले. अतिथी म्हणून खेमराज लिल्हारे, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, अ‍ॅड.वाय.एच. उपराडे, छाया वल्हारे, लोधी शक्ती संघटनेचे सचिव दयालदास डहारे, सरपंच मनिषा नागपुरे, उपसरपंच हेमराज सुलाखे, ज्ञानीराम दमाहे, प्राचार्य डी.आर. माहुले, मधुकर दमाहे, लीला नागपुरे, पुनाराम मोहारे, आडकूदास माहुले, उपसरपंच ममता गौतम व इतर मान्यवर उपस्थित होते. पोवारीटोला येथे तालुक्यातील एकमात्र अवंतीबाई यांचा अश्वारोही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या बलिदान दिनी उपस्थित पाहुण्यांनी त्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण केले व आदरांजली वाहिली. याप्रसंगी लोधी समाजासह इतर समाजबांधवांनीसुद्धा पुष्पांजली अर्पित केली. समाजाचे कार्यकर्ते कारूलाल नागपुरे यांची समर्पन भावना व स्वकृत्यामुळे पोवारीटोला येथे अवंतीबाईचा पुतळा साकार झाला. भेरसिंह नागपुरे पुढे म्हणाले, शहीद राणी अवंतीबाई लोधी समाजाच्या होत्या तरी त्यांनी राणी असताना रामगढचे शासन चालविताना सर्व समाजासाठी लोककल्याणाचे कार्य केले. राज्याला इंग्रजाच्या गुलामगिरीपासून दूर ठेवण्यासाठी इंग्रजाशी मरेपर्यंत संघर्ष केला, परंतु गुलामगिरी पत्करली नाही. त्यांनी केलेले कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत, असे ते म्हणाले. या वेळी यादनलाल बनोटे यांनी, शहिदांचे कार्य चिरकाल आठवणी ठेवणारे असतात, असे सांगितले. लोधी शक्ती संघटनचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. येशुलाल उपराडे यांनी अवंतीबाई यांच्या विविध ऐतिहासीक कामगिरीवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक किशोर नागपुरे यांनी मांडले. संचालन विजय मानकर यांनी केले. आभार डी.आर. माहुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी कारूलाल नागपुरे, मुलचंद नागपुरे, डोमनलाल नागपुरे, अजित नागपुरे, किशोर नागपुरे, धनराज नागपुरे, अजय नागपुरे, गोरेलाल सोनवाने, सेवंती नागपुरे, कमला पालेवार, सुरेश पंधरे, मुकेश दमाहे आदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)